Exit Poll Result : हरियाणा, काश्मीरात भाजप सत्तेबाहेर, महाराष्ट्रात काय होणार?

मुंबई तक

05 Oct 2024 (अपडेटेड: 06 Oct 2024, 12:22 PM)

Haryana and Jammu kashmir Exit Poll Result : आजतक आणि सी-व्होटरचा एक्झिट पोल समोर आला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनूसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरातून भाजप सत्तेबाहेर जाताना दिसते आहे.तर दोन्ही राज्यात काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. या निवडणुकीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊयात.

haryana and jammu kashmir exit poll 2024 what was the effect on maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti

महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे?

follow google news

बातम्या हायलाइट

point

पोलच्या अंदाजानुसार भाजपची सत्तेतून 'एक्झिट'

point

निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे?

point

महाराष्ट्रात कसा लागणार निकाल?

Haryana and Jammu kashmir Exit Poll Result : हरियाणा आणि जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल हा 8 ऑक्टोबरला लागणार आहे. तत्पुर्वी सी-व्होटरचा एक्झिट पोल समोर आला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनूसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरातून भाजप सत्तेबाहेर जाताना दिसते आहे.तर दोन्ही राज्यात काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. या निवडणुकीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊयात.(haryana and jammu kashmir exit poll 2024 what was the effect on maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti) 

हे वाचलं का?

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती करून निवडणूक लढवली आहे, तर मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर एकट्याने लढत आहेत. मात्र, यावेळी इंजिनिअर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापण करण्यासाठी 46 जागा हा बहुमताचा आकडा गाठणे महत्वाचे आहे. 

हे ही वाचा : Exit Poll : हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार? 10 वर्षांनी कोण येणार सत्तेत?

जम्मू काश्मीरचा एक्झिट पोलचा निकाल  

नेशनल कॉन्फरन्स-काँग्रेस : 40-48 
भाजप 27-32
पीडीपी 6-12 
अपक्ष 6-11

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेस पक्ष बहुमताच्या नजीक पोहोचला आहे. नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेस 40 ते 48 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 44 जागा पकडल्यास नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेसला बहुमतासाठी पीडीपी आणि अपक्षांची आवश्यकता असणार आहे. अशाप्रकारे नॅशनल कॉन्फरेन्स आणि काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करू शकते. भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर भाजपनंतर पीडीपी 6 ते 12 जिंकण्याचा अंदाज आहे. तर अपक्षांना 6 ते 11 जागा जिंकण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा : Exit Poll Result : जम्मू काश्मीरात भाजपला बसणार झटका? 'हा' पक्ष पोहोचला बहुमतानजीक

हरियाणा एक्झिट पोलचा निकाल 

भाजप : 20 ते 28 जागा 
काँग्रेस : 50 ते 58 जागा 
जेजेपील : 0 ते 2 जागा
अपक्ष : 10 ते 14 जागा

हरियाणात गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेत होती. यंदाच्या वर्षी भाजपचा हॅट्ट्रीक मारून सत्तेवर येण्याची संधी होती. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानूसार भाजपला अवघ्या 20 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एक्झिट पोलनूसार भाजपची सत्तेतून एक्झिट होताना दिसते आहे. तर काँग्रेसला 50 ते 58 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचा आकडा काढला दिसतेय. त्यामुळे पोलनुसार काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेत येणार आहे. एक्झिट पोलनुसार जेजेपीला अवघ्या 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अपक्षांना 10 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 10 वर्षांनी सत्तेत वापसी करताना दिसते आहे.  

निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? 

एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजानूसार जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर फारसा होणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण महाराष्ट्रात लाडकी बहीण सारख्या योजना आहेत. अन्नपूर्णा, वयोश्री सारख्या योजना आहेत. ज्या योजना इतर दोन राज्यात आहेत. या योजना नक्कीच महाराष्ट्रात महायुतीला तारू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. ही झाली पहिली बाजू. 

दुसऱ्या बाजूबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याने ओबीसीही आक्रमक आहे. आणि आता धनगर आरक्षणावरून ही राजकारण पेटलं आहे. त्यामुळे हे मुद्दे कुठेतरी महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. आणि राज्यातील हिट अॅड रन आणि बलात्काराची प्रकरण यावरून देखील सरकार विरोधात जनतेत रोष आहे. 

महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी मैदानात नक्कीच साफ नाही आहे. मैदानात त्यांनाही खूप घाम गाळावा लागणार आहे. कारण लोकसभा सहानुभूतीवर जिंकता आली आणि आता विधानसभा जिंकण तितकच सोप्प नसणार आहे, असे राजकीय जाणकारांना वाटते. एकूणच महाविकास आघाडीला आणखीण मजबूतीने समोर यावं लागणार आहे. त्यामुळे हे काही मुद्दे महत्वाचे आहे. 

    follow whatsapp