Exit Poll Result : हरियाणा, काश्मीरात कुणाची सत्ता येणार? महाराष्ट्राकडे सर्वाचं लागलं लक्ष

मुंबई तक

05 Oct 2024 (अपडेटेड: 05 Oct 2024, 07:43 PM)

Hariyana And Jammu Kashmir Exit Poll Result : जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीसाठीचे मतदान संपुष्टात आले आहे आणि सर्वाचे लक्ष आता एक्झिट पोलकडे लागले आहे. हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपची धडपड सुरू असताना, जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी आहे.

haryana and jammu kashmir exit poll result 2024 live update bjp chance to hatrick in hariyana jammu kashmir exit poll assembly election 2024

महाराष्ट्राकडे सर्वाचं लागलं लक्ष

follow google news

बातम्या हायलाइट

point

हरियाणाच्या एक्झिट पोलचे आकडे आले समोर

point

जम्मू काश्मीरात एक्झिट पोलचा अंदाज काय

point

या निकालानंतर महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रीत

Hariyana And Jammu Kashmir Exit Poll Result : जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीसाठीचे मतदान संपुष्टात आले आहे आणि सर्वाचे लक्ष आता एक्झिट पोलकडे लागले आहे. हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपची धडपड सुरू असताना, जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल आता थोड्याच वेळात हाती येणार आहे. या एक्झिट पोलवरून महाराष्ट्रात कसा निकाल लागेल याचा अंदाज बांधता येणार आहे. (haryana and jammu kashmir exit poll result 2024 live update bjp chance to hatrick in hariyana jammu kashmir exit poll)

हे वाचलं का?

हरियाणा विधानसभा

हरियाणात विधानसभेच्या 90 जागांवर निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत बाजी मारून सत्ताधारी भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे 2014 आणि 2019 मध्ये सत्तेवर आल्यानंतर भाजपला आता विजयाची 'हॅट्ट्रिक'ची आशा आहे. 

हे ही वाचा : Narhari Zirwal: मंत्रालयात फुल ड्रामा, नरहरी झिरवाळांना थेट जाळीवर का मारली उडी?

निवडणुकीच्या वर्षभरआधी मनोहर लाल खट्टर यांची जागा घेतलेले मुख्यमंत्री नायब सिंग सैनी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत. या निवडणुकांमध्ये त्यांचे राजकीय भवितव्यही पणाला लागले आहे. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मुख्य आव्हान आहे. दहा वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर भूपेंद्रसिंह हुड्डा पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही.

जम्मू-काश्मीर विधानसभा 

जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणुक ऐतिहासिक आहे. कारण 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे आणि पहिल्यांदाच पश्चिम पाकिस्तानातील निर्वासित, वाल्मिकी आणि गोरखा समुदाय अशा अनेक समुदायांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका झाल्या, तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 69.65 टक्के मतदान झाले. जम्मू प्रदेशात, उधमपूर, कठुआ आणि सांबा या जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 70 हून अधिक होती.

हे ही वाचा : Harshvardhan Patil: शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली तुतारी!

जम्मू-काश्मीरचे एक्झिट पोल 

आजतक आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, जम्मूमधील 43 जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला संयुक्तपणे 11-15 जागा, भाजपला 27-31 जागा आणि पीडीपीला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरचा निकाल 

नेशनल कॉन्फरन्स-काँग्रेस : 40-48 
भाजप 27-32
पीडीपी 6-12 
अपक्ष 6-11

    follow whatsapp