Prakash Shendge Maratha Reservation on Kunbi Certificate: मुंबई: ‘तुम्ही आता 50 टक्क्यांच्या आतलं आरक्षण मागत आहात.. पण तुम्ही मागासवर्गीयांचे भोग तुम्ही भोगले का? आम्ही भोगलेले आहेत. आमच्या तोंडाकडे बघून तुम्ही थुंकलेले आहात ना 10-10 पिढ्या आमच्या.. त्यामुळे हे मागासवर्गीयांचे भोग भोगायचे नाहीत. फक्त मागासवर्गीय म्हणून दाखले पाहिजे.’ अशा शब्दात ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी मराठा समाजाला (Maratha Community) कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. आज (7 नोव्हेंबर) मुंबईत मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडल्यानंतर शेंडगेंनी मीडियाशी संवाद साधला. (have you suffered like a backward classes asked obc leader prakash shendge and opposition to kunbi certificate for maratha community)
ADVERTISEMENT
यापुढे ओबीसींचे देखील लाखोंचे मोर्चे निघतील असंही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रात 60 टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज आहे. त्यामुळे सरकारने याचाही विचार करावा.. असा इशाराच प्रकाश शेंडगे यांनी यावेळी दिला आहे.
हे ही वाचा >> Sada Sarvankar : “अटक सोडा, गद्दारीचं बक्षीस दिलं”; आदित्य ठाकरे फडणवीसांवर संतापले
पाहा प्रकाश शेंडगे मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले
‘आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळे महाराष्ट्रातील ओबीसी इथून पुढे रस्त्यावरची लढाई सुरू करत आहोत. आम्ही दिवाळी संपायची वाट पाहत आहोत. दिवाळी झाली की, आमचं राज्यभर आंदोलन सुरू राहील. महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिला होता की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.’
‘सुरुवातीला सांगितलं की, आम्ही निजामांच्या नोंदी घेऊन.. त्या काही सुरुवातीला 11 हजार निघाल्या. आम्ही मान्य केलं. पण आता शिंदे समिती त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधायच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये म्हणजे मागासवर्गीयमध्ये घालायचं हे जे षडयंत्र आहे हे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.’
‘सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागस नाही हे यापूर्वी सांगितलं आहे. असं असताना आता कुणबी दाखला दिल्याने ते मागास होतात का? जात बदलण्याचा अधिकार कोणालाही नाहीए. जरी हा दाखला दिला गेला असला तरी आम्ही आता न्यायालयाची लढाई लढण्याचा निर्णय केला आहे.’
‘कुठली समिती नेमून कोणाला मागास ठरवता येत नाही. त्यासाठी प्रक्रिया आहे. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग आहे. आज ज्या समिती नेमण्यात आल्या आहेत त्यात सगळे मराठे आहेत. अशावेळी ओबीसींचं काय होणार या महाराष्ट्रात? प्रस्थापित मंडळी आपलं आरक्षण हिसकावून घेतील.’
‘आमचा पहिला मेळावा दिवाळीनंतर अंबडला होणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला दुसरा मेळावा हिंगोलीला होईल. आम्हीही दाखवून देऊ आमच्याकडे 60 टक्के लोकसंख्या आहे. ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही असं समजू नका.’
‘भुजबळ साहेबांच्या पाठिशी ठामपणे ओबीसी उभे आहेत. सगळ्या नेत्यांनी ठरवलं आहे की, मरणाची लढाई लढायची पाळी आली तरी चालेल. पण कुठल्याही परिस्थितीत या आमच्या गरीब ओबीसी समाजाचं आरक्षणाला संरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. जे कोणी आमदार ओबीसीच्या विरोधात जातील त्यांना ओबीसी समाज मतदान करणार नाही..’
‘सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की, मराठा समाज मागस नाही. असं असताना त्याला पुन्हा मागासवर्गीय ठरविण्याचा हा जो प्रयत्न आहे तो घटनाबाह्य आहे.’
‘मराठ्यांच्या आरक्षणाला आम्ही विरोध केलेला नाही. त्यांचे ते सकल मराठा समाजाचे जे 58 मोर्चे निघाले. तेव्हा त्यांची मागणी होती की, त्यांना 50 टक्क्यांच्या वरचं आरक्षण हवं होतं. ते घ्या ना.. आम्ही नाही म्हटलं नाही.’
‘तुम्ही आता 50 टक्क्यांच्या आतलं आरक्षण मागत आहात.. पण तुम्ही मागासवर्गीयांचे भोग तुम्ही भोगले का? आम्ही भोगलेले आहेत. आमच्या तोंडाकडे बघून तुम्ही थुंकलेले आहात ना 10-10 पिढ्या आमच्या.. त्यामुळे हे मागासवर्गीयांचे भोग भोगायचे नाहीत. फक्त मागासवर्गीय म्हणून दाखले पाहिजे आणि ओबीसींच्या हक्काचं आरक्षण हडप करायचे याला आमचा विरोध आहे.’ असं म्हणत प्रकाश शेंडगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी जोरदार विरोध केला आहे.
हे ही वाचा>> ‘आज महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची गरज होती’, ‘हा’ मराठी अभिनेता थेटच बोलला!
दरम्यान, आता प्रकाश शेंडगेंच्या या पवित्र्यानंतर मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे-पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT