Aaditya Thackeray Mumbai tak Baithak 2024 News: २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९ जागाच मिळाल्या. तर दुसरीकडे भाजपच्याही जागा घटून ९ झाल्या. या निवडणूक निकालावर भाष्य करताना शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या नेत्याने राजीनामा द्यायला पाहिजे, असे विधान केले. (Aaditya Thackeray Exclusive Interview with Mumbai Tak Baithak)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत शिवसेना १९ वरून ९ वर आल्याचे दुःख झाले की, भाजप २३ वरून ९ वर आल्याचा जास्त आनंद झाला. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "कुणाच्या दुःखात आनंद घेणार आम्ही नाही. आमच्या मनात ते कधीही नसतं. पण, एक निश्चित देशाला मोकळा श्वास घ्यायला मिळालं. 350, 400 पार सुरू होतं; ज्या लोकांना वाटतं होतं की ते संविधान बदलू शकतात, ती लढाई अजून संपलेली नाही. 330 वरून २४० म्हणजे हा देश कुणाच्या डोक्यात मस्ती जाऊ देत नाही."
हेही वाचा >> लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले
"भाजपमध्ये जे नेते दबून होते, जे नाराज होते, त्यांनी आनंदाने फोन केला आणि अभिनंदन केला. देशभरातील नेत्यांनी. यात महत्त्वाचं म्हणजे जो पक्ष स्वतःला ४०० पार सांगतो आणि २७२ ही घेऊ शकत नाही. देश त्यांना तेवढा आशीर्वाद देत नाही. त्यांचा हा विजय नाही, हार आहे. जे नेते... खरंतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. भाजपमध्ये ही चर्चा सुरू आहे, मला माहिती नाही. त्यांच्या अंतर्गत राजकारणात मला जायचं नाही", असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढवणार?
तुम्ही ठाण्यातून निवडणूक लढवायला तयार आहात का? तुम्ही चॅलेंज दिलं होतं. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "मी तर त्यांना चॅलेंज दिलेलं आहे. वरळीतून या आणि लढा."
हेही वाचा >> भाजप विधानसभेच्या किती जागा लढणार?; फडणवीसांनी सांगितला आकडा
"वाराणसी जर बाजूला असता, तर मी नक्की तिथून लढलो असतो. वाराणसी लांब आहे म्हणून वरळी. मताधिक्य आहे. मी पंतप्रधान नसताना तिथून मताधिक्य आहे. त्यामुळे मी वरळीतूनच लढेन", असे आदित्य ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी निकालाची जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना काम करत राहण्याचे निर्देश दिले. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी फडणवीसांकडे बोट केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT