Murlidhar Mohol : "मुंडे साहेबांना आज खूप आनंद झाला असता", मोहोळ झाले भावूक

मुंबई तक

• 03:52 PM • 23 Jun 2024

Murlidhar Mohol Latest News : पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. या आनंदप्रसंगी कुणाची आठवण येते? या प्रश्नाला उत्तर देताना मोहोळ भावूक झाले.

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली.

गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना मुरलीधर मोहोळ भावूक झाले.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुरलीधर मोहोळ गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत भावूक

point

गोपीनाथ मुंडेसोबतच्या आठवणींना मोहोळ यांनी दिला उजाळा

point

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला किस्सा

 Murlidhar Mohol News : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे सहकार आणि नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्री बनले. थेट मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. या सगळ्यात तुम्ही कुणाला मिस करत आहात, असा प्रश्न जेव्हा मोहोळांना विचारला गेला. तेव्हा ते भावूक झाल्याचे दिसले. मुंडे साहेबांना मिस करतोय, असे सांगत त्यांनी सर्व आठवणींना उजाळा दिला. (Muralidhar Mohol recalled his memories with Gopinath Munde)

हे वाचलं का?

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना एबीपी माझाला मुलाखत दिली. खासदारकी मिळाली. एका रात्रीत मंत्री झालात. पण या सगळ्यात आज तुम्ही नेमकं कुणाला मिस करत आहात? असा प्रश्न मोहोळ यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, "खरंतर आता सगळे दिसताहेत. पण, मी खऱ्या अर्थाने झाल्या दिवसापासून मला जर आठवण येत असेल ना, तर मुंडे साहेबांची." 

मुंडे साहेब आज पाहिजे होते -मुरलीधर मोहोळ

"त्यांच्या खूप जवळ होतो. त्यांनी खूप प्रेम केले. राहून राहून वाटतंय की, आज मुंडे साहेब असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता. त्यामुळे मला साहेबांची खूप आठवण येतेय. हे बघायला ते पाहिजे होते. ते नक्की मी मिस करतोय आज", असं बोलताना मोहोळ भावूक झाले.

हेही वाचा >> "वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका", थेट लोकसभा महासचिवांना नोटीस 

मुंडेंसोबत काय नातं होतं? या प्रश्नाला उत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, "कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता. मला आठवतं की, मी २००९ ला निवडणूक हरलो. त्यानंतर ज्या-ज्या वेळी मुंडे साहेबांचा पुण्यात प्रवास आला. जेव्हा यायचे, तेव्हा मी त्यांच्या पुढे जातच नव्हतो. भीतीनेच जायचो नाही."

मुंडे साहेब पुण्यात आले की मी लांब थांबायचो -मुरलीधर मोहोळ

"दोन वेळा झाले. तीन वेळा झाले. कदाचित त्यांच्या ते लक्षात आलं असावं की, पुण्यात आल्यानंतर हा पहिल्यासारखा दिसत नाही. भेटत नाही. जवळ येत नाही. मी लांबच थांबायचो. त्यांनी मला गर्दीतून बोलून घेतलं. आणि म्हणाले माझ्या आयुष्यातील पहिली निवडणूक मी पण हरलो होतो. काही विचार नको करू. काही मनात आणू नको. तुझं तू काम करत रहा. हा विचार होता", अशी आठवण मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली.

हेही वाचा >> पंकजा मुंडे खासदार होणार? भाजपमध्ये हालचाली सुरू 

"मला खूप सहवास लाभला. मुंडे साहेब लोकनेते. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श होता. त्यांच्या सहवासात पुण्यात कार्यकर्त्यांची एक फळी घडली. आज ते नाहीयेत. अचानक त्यांचे जाणे हा त्यातला भाग आहे. साहेब आज असते, तर आम्हाला खूप आनंद झाला असता. खरंतर त्यांनी आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं. ते हवे होते", असे सांगताना मोहोळ भावूक झाले.

    follow whatsapp