Maharashtra Budget 2024 : 'या' कुटुंबियांना मिळणार 3 मोफत सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचे निकष काय?

मुंबई तक

• 09:17 PM • 28 Jun 2024

Mukhymantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून वर्षातून 3 सिलिंडर मोफत दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही. त्यामुळे या योजनेचा नेमका कोणत्या कुटुंबियांना फायदा होणार आहे?

maharashtra budget 2024 these women get three free cylender every year in mukhymantri annapurna yojana

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून वर्षातून 3 सिलिंडर मोफत दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली होती.

follow google news

Mukhymantri Annapurna Yojana : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी अनेक तरतूदी करण्यात आल्या होत्या. यात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून वर्षातून 3 सिलिंडर मोफत दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही. त्यामुळे या योजनेचा नेमका कोणत्या कुटुंबियांना फायदा होणार आहे? या योजनेचे निकष काय आहेत? हे जाणून घेऊयात. (maharashtra budget 2024 these women get three free cylender every year in mukhymantri annapurna yojana) 

हे वाचलं का?

महिला या किचनचं संपूर्ण बजेट सांभाळतात. मात्र सध्या घरगुती गॅसचे दर अधिक असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे या गृहिणींना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. परंतु ही योजना सरसकट सगळ्यांसाठी लागू होणार नाही आहेत. त्यासाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत. 

हे ही वाचा : संशयाच भूत डोक्यात शिरलं, लोखंडी रॉडने पत्नीला संपवलं; नेमकं काय घडलं?

ज्या महिलांकडे  बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळे आणि केशरी रेशनकार्ड आहेत. अशा महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.

    follow whatsapp