Rahul Narvekar : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनता न्यायालय घेऊन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाची चिरफाड केली होती. ठाकरे गटाच्यावतीन अॅड. असीम सरोदेंनी (Asim Sarode) कायदेशीर बाजू मांडत न्यायालय आणि यंत्रणा कशा दबावाखाली काम करत आहेत त्याच्यावर टीका केली होती. तर त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंचे अनेक मुद्दे खोडून काढत मी जो निकाल दिला आहे तो शिवसेनेच्या (Shiv sena) 1999 च्या घटनेनुसार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निकालावर बोलताना सांगितले की, ठाकरे गटासारखं मी फक्त पुरावे दाखवले नाही तर ते वाचूनही दाखवले असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.(‘I didn’t just show the evidence I read it Rahul Narvekar replied Thackeray group)
ADVERTISEMENT
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयाची ज्यावेळेला राजकीय पक्ष कोणता हे ठरवायचा विचार केला तर त्यासाठी निवडणूक आयोगाकडे जी घटना सादर केलेली असते त्याचा आधार घ्यावा असं स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आपण निर्णय दिला आहे असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षाबाबत नेमकं काय म्हटले आहे त्याचाही त्यांनी दाखला दिला आहे.
हे ही वाचा >> ‘पळून गेलेले सगळे लोकशाहीद्रोही’, नार्वेकरांच्या निकालावर सरोदेंचं कायदेशीर स्पष्टीकरण
संविधानावर निकाल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाकडून केले गेलेले आरोप खोडून काढत निवडणूक आयोगाकडून जी घटना मागवण्यात आली होती. त्यानंतर 1999 ची घटना देण्यात आली होती. त्यानुसार निर्णय देण्यात आला आणि हा निर्णय संविधानाच्या आधारे दिला आहे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
घटना सुधारित नाही
ज्या प्रकारे ठाकरे गटाकडून टीका केली जाते त्यांच्या त्या टीकेला पुरावा काय आहे. कारण त्यांच्याकडून जी शिवसेनेचे घटना दाखवली जाते ते घटना 2018 मधील सादर केली आहे. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून नंतर ती सुधारणाच करण्यात आली नाही आणि ही बाजून निवडणूक आयोगाकडूनही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे 1999 ची जी घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, तिच घटना निवडणूक आयोगानेही ग्राह्य धरल्याचे त्यांनी सांगितेल.
ठाकरेंना नैतिक अधिकार नाही
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाकडून ज्या 2013 च्या घटना दुरुस्तीचा व्हिडीओ दाखवण्यात येतो मात्र त्यामध्ये खरचं घटना दुरुस्ती झाली आहे का हा प्रश्न आहे. कारण शिवसेनेकडून जे पत्र देण्यात आले होते, त्यामध्ये कोणतीही घटनादुरुस्ती झाली नाही. त्यातच ठाकरे गटाकडून आजही माझ्यावर गंभीर आरोप केले जात असले तरी त्यांनी याआधी माझ्यासमोर कधी युक्तीवाद केला नाही त्यामुळे त्यांना माझ्यावर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असंही नार्वेकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
निकाल कायदेशीर दिला
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याकडून वारंवार एक कागद दाखवायचा प्रयत्न केला जातो. त्यावर निवडणूक आयोगाचा स्टॅंप असल्याचेही दिसते. मात्र त्यामध्ये काय आहे हे वाचून कधी दाखवले नाही. त्यामुळे संविधानानुसार जी संघटनात्मक रचना सांगितली जाते, राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना सांगितली गेली आहे ती रचना शिंदे गटाच्या शिवसेनेने सादर केली होती. त्या आधारे आणि ती रचना ग्राह्य धरुनच मी कायदेशीर निकाल दिला आहे अशा स्पष्ट शब्दात ठाकरे गटाला त्यांनी उत्तर दिले आहे.
संविधानाचा अनादर
यावेळी राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले की, जी लोकं संविधानाची हत्या होत आहे अशी विधानं करत होते, त्याच लोकांकडून संविधानाने नेमलेल्या लोकांबद्दल अनादर व्यक्त करतात. त्यामुळे त्यांनी संविधानावर बोलू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT