26/11 Terrorist Attack on Mumbai :
ADVERTISEMENT
इस्रायलच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना (Amir Ohana) यांचा भारत दौरा 31 मार्चपासून सुरू होत आहे. इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांच्या ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. त्यामुळे अमीर ओहाना यांच्या भारत (India) दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. अशातच त्यांनी भारत दौऱ्यापूर्वी मुंबई हल्ल्याबाबत मोठे विधान केले आहे. (Israel Parliament Speaker Amir Ohana’s four-day visit to India begins on March 31)
2008 च्या मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अमीर ओहाना यांनी दिला आहे. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांसमोर दहशतवाद ही सर्वात मोठी समस्या असून दोन्ही देश मिळून त्याचा सामना करतील, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ओहाना यांनी इस्रायलच्या संसदेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी हाती घेतली. त्यानंतर ते प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत. 31 मार्चपासून त्यांचा चार दिवसांचा भारत दौरा सुरू होत आहे.
हेही वाचा : छ. संभाजीनगर: ‘त्या’ भागात 99 टक्के मुस्लिम समाज, हल्ला करणारे त्यांचेच लोक; कराडांचा मोठा आरोप
‘त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल’ :
ओहाना म्हणाले की, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दुर्दैवाने, या हल्ल्यात मारल्या गेलेल्या परदेशी लोकांमध्ये छाबाद हाऊसमध्ये आलेल्या इस्रायली आणि ज्यू लोकांचाही समावेश होता. हा केवळ भारतावरच नव्हे तर ज्यूंवरही हल्ला होता. हा भारत आणि इस्रायलच्या सामायिक मूल्यांवर हा हल्ला होता. त्यामुळे या हल्ल्याचा कट ज्यांनी रचला आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मुंबईत पाठवले, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. मुंबईतील छाबाद हाऊसवरील हल्ला हे भारत आणि इस्रायलच्या सामायिक दुःखाचे प्रतीक आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई सर्व मुक्त देशांची गरज आहे, विशेषत: भारत आणि इस्रायलसारख्या देशांसाठीची ही मोठी गरज आहे.
हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : हिंसाचार करणारे सीसीटीव्हीत कैद, 6 CCTV फुटेज समोर
‘पहिल्या भेटीसाठी भारताची निवड’ :
ओहाना म्हणाले, जेव्हा मी संसदेचा अध्यक्ष म्हणून माझ्या पहिल्या अधिकृत भेटीला कुठे जायचे तेव्हा भारत हे अनेकांचे उत्तर होते. कारण भारत एक उदयोन्मुख महासत्ता आहे. भारत आणि इस्रायलमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. आतापर्यंत एकाही इस्रायली वक्त्याने भारताला भेट दिली नाही. मला असे वाटले की इस्रायली वक्त्याने भारताच्या दौऱ्यावर जाण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा : PM Modi यांच्या गुजरातमधील अहमदाबादचं नावं मनसेच्या रडारवर; केली मोठी मागणी
‘चाबड हाऊसवर जाऊन श्रद्धांजली वाहणार’ :
भारत भेटीदरम्यान ओहाना, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. त्यांचे शिष्टमंडळ मुंबईलाही भेट देणार आहे, यावेळी ते छाबाद हाऊस येथे प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. यादरम्यान ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या सीईओंनाही भेटणार आहेत.
ADVERTISEMENT
