Sachin Vaze : जयंत पाटील अडकणार? फडणवीसांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई तक

03 Aug 2024 (अपडेटेड: 03 Aug 2024, 09:29 AM)

Sachin Vaze Latest News : अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. 

सचिन वाझेच्या पत्रात जयंत पाटील यांचे नाव.

जयंत पाटील आणि सचिन वाझे

follow google news

बातम्या हायलाइट

point

सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर आरोप

point

देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र

point

फडणवीसांना दिलेल्या पत्रात जयंत पाटलांचेही नाव

Sachin vaze news : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असून, यात आता सचिन वाझेने नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. कथित 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेने देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यात जयंत पाटील यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. (Sachin Vaze written a letter to Devendra Fadnavis in 100 crore extortion case)

हे वाचलं का?

अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे -सचिन वाझे

सचिन वाझे म्हणाला की, "जे काही आहे, त्याचे पुरावे आहेत. सगळे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएच्या माध्यमातून दिले जात होते. आणि सीबीआयकडेही पुरावे आहेत. मी अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे." 

"सगळे काही त्यांच्या विरोधात गेलेले आहे. सगळे पुरावे त्यांना दिले आहेत. मी सर्व पुरावे पाठवले आहेत", असे वाझे म्हणाला. 

सचिन वाझेच्या पत्रात जयंत पाटलांचे नाव

त्यानंतर यात कुणाचे नाव आपण सांगू शकता का?, असा प्रश्न वाझे म्हणाला, "पत्र लिहिले आहे, त्यात जयंत पाटील यांचे नाव लिहिलेले आहे."

अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस राजकीय वाद

सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असे विधान केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. 

फडणवीस यांनी मला चार प्रतिज्ञापत्रे पाठवली होती. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना खोट्या आरोपाखाली अडकण्याचा प्रयत्न होता, असा आरोप केलेला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कुणाच्या नादाला लागत नाही. कुणी माझ्या नादाला लागले तर सोडत नाही, असे सांगत फडणवीस यांनी देशमुखांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, आता सचिन वाझेच्या विधानाने लक्ष्य वेधून घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे वाझेने फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे सांगितले. त्यामुळे जयंत पाटलांबद्दल त्या पत्रात काय, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 

 

    follow whatsapp