Jaykumar Gore: भाजप आमदार अडचणीत! हायकोर्टाने पोलिसांना झापले, प्रकरण काय?

विद्या

23 Jul 2024 (अपडेटेड: 23 Jul 2024, 10:27 AM)

Jaykumar Gore High Court: भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत पोलिसांची कानउघाडणी केली आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणात उच्च न्यायालयाने पोलिसांना झापले.

follow google news

बातम्या हायलाइट

point

जयकुमार गोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

point

मुंबई उच्च न्यायालयाने तपास करण्याचे दिले आदेश

point

जयकुमार गोरेंनी मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून पैसे लाटल्याचा आरोप

Jaykumar Gore News: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत पोलिसांचे कान पिळले आहेत. 'पोलिसांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखे आहे,' अशा शब्दात न्यायालयाने पोलिसांना सुनावले. (Bombay High Court Slams Satara police over jaykumar gore corruption case investigation)

हे वाचलं का?

कोविड काळामध्ये 200 पेक्षा जास्त रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून घोटाळा केल्याचा आरोप जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी (22 जुलै) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप गांभीर्याने घ्या, अशी ताकीदच सातारा पोलिसांना दिली. 

एससी कोर्टात घाम कसा फुटला?

न्यायालय म्हणाले की, "पोलिसांनी सादर केलेल्या मृत्यू दाखल्यासंबंधीची सर्व कागदपत्रांची आम्हीच छाननी करू. पोलिसांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखे आहे."

हेही वाचा >> तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! गर्भवती प्रेयसीचा मृत्यू, नंतर दोन मुलांना जिवंत फेकलं नदीत

कोर्टाचे ताशेरे अधिकाऱ्यांना फुटला घाम

न्यायालायने जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीवर पोलीस प्रशासनाला फैलावर घेतले. यावेळी अधिकाऱ्यांना घाम फुटला. "एसी सुरू असताना तुम्हाला घाम कसा फुटला," असा सवाल न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना केला. 

जयकुमार गोरे प्रकरण काय? 

कोविड काळात सरकारने उपचारासाठी सर्व रुग्णालयांना आणि कोविड केंद्रांना मोफत औषधे पुरविली होती. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. 

या संस्थेचे त्यावेळी अध्यक्ष जयकुमार गोरे होते. गोरे यांनी रुग्णांकडून औषधांचे पैसे घेतले, असा आरोप मायणीच्या दीपक देशमुख यांनी केलेला आहे. जयकुमार गोरे यांनी २०० पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून सरकारकडून विविध योजनांमधून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >> लाडकी बहीण योजनेचा जन्मच दिघे साहेबांमुळे -प्रविण तरडे 

डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे यांच्या आधारे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांतून पैसे मिळवले. यात त्यांच्या पत्नीही सहभागी असल्याचा आरोप असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.

    follow whatsapp