Jitendra Awhad Criticize Ajit Pawar Group : केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी शरद पवार (Sharad Pawar) गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' असं नाव दिले आहे. या नवीन नावावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार
(Ajit Pawar) गटावर जोरदार टीका केली आहे. एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे, म्हणूनच आम्हाला "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार" नाव मिळालं आहे. हेच खरे पक्षाचे जन्मदाते आहेत, पण काही पाकिटमारांनी घड्याळ चोरल्याची टीका आव्हाडांनी अजित पवार यांच्यावर केली. (jitendra awhad criticize ajit pawar group ncp political crisis sharad pawar group election commision)
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे, म्हणूनच आम्हाला "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार" नाव मिळालं आहे. हेच नावं आम्हाला हवं होत आणि तेच मिळालं, आता यांना नावं देणार 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार अलीबाबा 40 चोर पार्टी' कारण त्यांनी पाकीटमारासारखं आमचं घड्याळ मनगटावरून चोरलं आहे, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवारांवर टीका केली.
शरद पवार हेच खरे पक्षाचे जन्मदाते आहेत. काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले पण दुर्देवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल,असे विधान करून जितेद्र आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं.
आव्हाडांनी यावेळी निवडणूक आयोगावरही टीका केली. हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते. हा पक्ष कोणी मोठा केला यावर धादांत खोटं निवडणूक आयोग बोललय. आयोगाचा निर्णय दुटप्पी आणि संभ्रम निर्माण करणारा होता. निवडणूक आयोग कटपुटली बनलीय, अशी टीका आव्हाडांनी केली.
तुम्ही कितीही काही करा, तुम्ही पाकिटमारासारखं घड्याळ चोरलंय, पण पवार साहेबांचं मनगट मजबूत आहे, पवार साहेब अजुन मजबुतीने आता उभे राहतील असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त करत, काल तुम्ही प्लान करुन पवार साहेबांचा गळा घोटला, तुम्हाला लाज वाटली नाही, अशी टीका अजित पवारांवर केली. तसेच महाराष्ट्राच्या मनात राग आहे, पवार साहेबांना तुम्ही छळलंय त्याच उत्तर महाराष्ट्राले तरुण, तरुणी,वयस्कर देतील. नियती कसा सूड घेईल हे आता काळ बघे, असे देखील आव्हाड म्हणाले.
ADVERTISEMENT