Kirit Somaiya : पुण्यात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ईडीच्या (ED Action) कारवाईवरून किरीट सोमय्यांवर बोचरी टीका केली होती. त्यानंतर आज किरीट सोमय्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी सोमय्यांनी गंभीर आरोप करत मुंबईची साफ सफाई करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेनं केल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हिशोब मी देणार
यावेळी त्यांनी बोलताना त्यांना सांगितले की, ‘संजय राऊत जी भाषा बोलतात, तिच भाषा संदीप राऊत बोलत असतात. कोरोना काळात काही हिशोब, कागदपत्रं नव्हती पण ठिक आहे म्हणत तुझा हिशेब मी द्यायला तयार’ असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. कोविड काळात केलेल्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्यांनी ही टीका केली आहे.
हे ही वाचा >> Manoj jarange : ‘थेट कोर्टात भेटू’, ठाकरेंच्या नेत्याचं जरांगेंना आव्हान
लुटमार केली
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. ‘कोरोना काळात किती लुटमार केली आहे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहिती असल्याचा’ गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
कोट्यवधी त्यांच्या खात्यात
खिचडी घोटाळ्यावरून निशाणा साधताना सोमय्यांनी कोरोना काळात मोठा आर्थिक घोटाळा ठाकरे गटाने केल्याचे सांगत, ‘सूरज चव्हाण, अमोल कीर्तीकर यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये आल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.’
कोविड सेंटर मुलाला दिलं
किरीट सोमय्यांनी एकाच वेळी उद्धव ठाकरेंपासून ते पार्टनर रवींद्र वायकर यांच्यापर्यंत टीका केली. यावेळी ते म्हणाले की, ‘यांनी 500 कोटीचे हॅाटेल, किशोरी पेडणेकरांनी न सुरु केलेलं कोविड सेंटर महालक्ष्मीचं त्यांचे कंत्राट किशोरी पेडणेकर यांनी मुलाला दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.’ आता राऊत आणि सोमय्या हा वाद आणखी रंगणार असल्याचं दिसून येत आहे.
500 कोटींच्या हॅाटेलची परवानगी
मुंबईची साफ सफाई करण्याचं काम उद्धव ठाकरे सेनेनं केला आहे. त्यामुळे हिशेब तर द्यावाच लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता ईडी कार्यालयात वायकर येऊन गेले असले तरी मनपा कर्मचाऱ्यांना बोलावलं जाणार असल्याचं सांगत 500 कोटींच्या हॅाटेलची परवानगी दिली कुणी असा सवाल त्यांनी शिवसेनेला आणि राऊतांना केला आहे.
ADVERTISEMENT