kripa shankar singh Jaunpur lok sabha election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी 2 मार्चला 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील जौनपुर येथुन लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली होती. कृपाशंकर सिंह एकमेव असे उमेदवार होते, ज्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवाराला उत्तर प्रदेशमधुन उमेदवारी मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता कृपाशंकर सिंह यांनीच तिकीट मिळण्याची संपू्र्ण कहाणी सांगितली आहे. (kripa shankar singh bjp candidate from jaunpur lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
भाजप उमेदवार कृपाशंकर सिंह यांनी युपी तकशी बोलताना सांगितले की, ''मी खूप आनंदी आहे. कारण पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी आता जौनपुरच्या जनतेचाही विश्वास जिंकणार आहे. आम्ही 400 पेक्षा अधिक जागा जिंकू आणि जौनपूर त्यामधलीच एक असेल'', असा विश्वास कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : 'तुम्हाला खोके नव्हे,कंटेनर लागतात', शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात
कृपाशंकर सिंह पुढे म्हणतात, ''मी काँग्रेसमध्ये असतानाही खूप मेहतन केली होती. त्यावेळेस मुंबईच्या सहाही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. माझ्या शब्दकोशात थकवा असा शब्द नाही. मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे, मी किती मेहनत करतो, हे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान लोकसभेच्या तिकीटावर बोलताना कृपाशंकर सिंह म्हणाले की, मला माहितीच नव्हतं माझ्या नावाची घोषणा होणार होती. पण गेल्या दोन दिवसांपासून मला फोन येत होते. मला तिकीट दिले जाईल. माझ्या कार्यकर्त्यांनी या घोषणेनंतर फटाकेही फोडली होते.
हे ही वाचा : ठाकरेंनी मागितला 'हा' मतदारसंघ; अन् MVA मध्ये मोठा...
कोण आहेत कृपाशंकर सिंह?
जौनपूर जिल्ह्यातील सहोदरपूर ग्रामसभेच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात कृपा शंकर सिंह यांचा जन्म झाला होता. कृपा शंकर सिंह वयाच्या 21 व्या वर्षी मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर 1972 मध्ये फार्मास्यूटीकल कंपनीमध्ये लॅब असिस्टंटच्या रूपात त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1977 मध्ये त्यांनी राजकारणारत पाऊल ठेवले आणि महाराष्ट्र काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली.
दरम्यान 4 वर्षापूर्वी भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्याच्या निर्णय घेतला. भाजपच्या याच निर्णय कृपाशंकर सिंह यांना आवडला आणि यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतले. कृपा शंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता ठेवल्याचाही आरोप आहे. त्यांच्या मुलाचे नाव 2जी घोटाळ्यातही आले होते.
ADVERTISEMENT