Kunal Kamra : एकनाथ शिंदेंनंतर कुणाल कामराचा मोदींवरही नाव न घेता निशाणा? नेमकं काय म्हणाला, वाचा...

Kunal Kamra Controversy: कुणाल कामराने हा आपल्या स्टँड अप कॉमेडीमधून राजकीय गोष्टींवर व्यंगात्मक टीका करत असतो. राज्यात काही वर्षांपूर्वी झालेल्या सत्तेच्या उलथापालथीनंतर राज्यात वातावरण ढवळून निघालं होतं. त्यावरुन केलेल्या व्यंगात्मक टीकेनंतर तो वादात सापडला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

24 Mar 2025 (अपडेटेड: 24 Mar 2025, 02:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कुणाल कामरा नरेंद्र मोदींबद्दल काय बोलला?

point

नरेंद्र मोदींबद्दलही कुणाल कामराची फकटेबाजी?

point

मोदींबद्दल बोलताना कुणाल कामराने काय शब्द वापरले?

Kunal Kamra on Narendra Modi : कुणाल कामराने केलेल्या एका व्यंगात्मक काव्यामुळे सध्या शिवसैनिक संतप्त झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता कुणाल कामराने आपल्या कॉमेडीमधून शिंदेंवर निशाणा साधला होता. मात्र, ज्या स्टँड अप कॉमेडीवरुन हा प्रकार घडला, त्या व्हिडीओमध्ये पुढे आणखी एक टोला मोदींनाही मारल्याचं बोललं जातंय. 45 मिनिट 41 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मोदींवर नाव न घेता निशाणा साधलाय.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Kunal Kamra : कुणाल कामराने असं काय गाणं रचलं, ज्यामुळे शिवसैनिक संतापले? वाचा जसंच्या तसं...

कुणाल कामराची मोदींवरही टीका?

टाईम मशिन आणि लोकांच्या इच्छा यावर कॉमेडी करत असतान "मला जर टाईम मशिन मिळाली, तर मी 1970 च्या भारता फिरणं पसंत करेल. तेव्हा भारत मस्त होता, रस्ते नव्हते, टोल नव्हते. गाड्या कमी होत्या, ट्रेन होत्या फक्त. ट्रेनमध्ये बसून जायचं, कुठेही उतरायचं. एखाद्या स्टेशनवर उतरुन एखाद्याकडे बघून म्हणाचं, ही काय चहा आहे का #$%@...? ही चहा आहे का? नो वंडर पत्नी तुला सोडून जाईल... आणि हा कोण आहे सोबत? मोठा होऊन टकला होईल हा...." असं कुणाल कामरा म्हणाला. 
 

पुढे बोलताना कुणाल कामरा असंही म्हणाला की, "हा जोक ज्याला कळला, तो चिडू शकत नाही. जर चिडला तरी तो FIR नाही करु शकत. कारण का जोक कुणाबद्दल आहे, कुणाला माहिती.."
 

हे ही वाचा >> Nanded Crime : "तू पाटील, तुझी लायकी नाही..." म्हणत तरूणाला मारहाण, मारहाणीनंतर प्रियकरानं स्वत:ला संपवलं

दरम्यान, कुणाल कामराने हा आपल्या स्टँड अप कॉमेडीमधून राजकीय गोष्टींवर व्यंगात्मक टीका करत असतो. राज्यात काही वर्षांपूर्वी झालेल्या सत्तेच्या उलथापालथीनंतर राज्यात वातावरण ढवळून निघालं होतं. त्यावरच कुणाल कामरा आपल्या कॉमेडीमधून व्यक्त झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. यावेळी कुणाल कामराने भोली सी सुरत, आँखो में मस्ती... या गाण्याच्या चालीवर एक व्यंगात्मक काव्य केलं. त्यावरुन सध्या चांगलाच वाद सुरू आहे. या पाऊन तासाच्या व्हिडीओमध्ये दरम्यान कुणाल कामराने, अंबानी कुटुंब, सुधा मूर्ती, नारायण मूर्ती यांच्यासह अनेकांवर निशाणा साधला आहे. 


    follow whatsapp