BJP Saumitra Khan Vs TMC Sujata Mandal : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या 42 जागांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. या 42 जागांपैकी बिष्णुपुर मतदार संघ खूप चर्चेत आला आहे. यामागचं कारण ठरलंय ते म्हणजे या मतदारसंघात माजी नवरा विरुद्ध बायको अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे हे नवरा बायको कोण आहेत? ते नेमके कोणत्या पक्षातून एकमेकांविरूद्द उभे ठाकले आहेत. हे जाणून घेऊयात. (Lok sabha elction 2024 bjp saumitra khan vs tms sujata mandal bishnupur lok sabha election west bengal)
ADVERTISEMENT
तृणमूल काँग्रेसने रविवारी 42 जागांवर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यामधील बिष्णुपूर मतदार संघातून त्यांनी सुजाता मंडल (Sujata Mandal) यांना उमेदवारी दिली आहे. तर याच जागेवर भाजपने सौमित्र खान (Saumitra Khan) यांना उमेदवारी दिली आहे. सौमित्र खान आणि सुजाता मंडल या माजी नवरा-बायको आहेत. त्यामुळे बिष्णुपूर मतदार संघात माजी नवरा-बायकोमध्ये थेट लढत होणार आहे. या लढतीची चर्चा राज्यभरात सूरू आहे.
हे ही वाचा :Vijay Shivtare : अजित पवार, सुप्रिया सुळे टेन्शनमध्ये; शिवतारेंचा प्लॅन ठरला!
दरम्यान खासदार सौमित्र खान आणि सुजाता मंडल हे पती-पत्नी होते. 2021 मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला होता. या घटस्फोटाचा एका दिवसानंतरच सुजाता मंडल यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. सुजाता यांच्या या निर्णयानंतर सौमित्र खान प्रचंड आक्रमक झाले होते. सौमित्र खान यांनी त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन घटस्फोटाची घोषणा केली होती.
सौमित्र खानने पत्रकार परिषद बोलावून त्यांचे 10 वर्षांचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय जाहीर केला होता. "तुम्ही (सुजाता) जय श्री रामचा नारा दिल्याने, (नरेंद्र) मोदीजींच्या बाजूने नारे दिल्याने तुम्ही (सुजाता) इथपर्यंत पोहोचला आहात, कारण तुम्ही सौमित्र खानच्या पत्नी आहात." त्यांना काही कळत नाही. पण कृपया 'खान' हे आडनाव वापरू नका, असे सौमित्र खान म्हणाले होते. कृपया कधीही स्वतःला सौमित्र खानची पत्नी म्हणून ओळखू नका. मी तुम्हाला तुमचे राजकीय भवितव्य ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देत आहे. पण मी भाजपमध्ये आल्यानंतर 2019 मध्ये ज्यांनी तुमच्या पालकांच्या निवासस्थानावर हल्ला केला त्यांची बाजू तुम्ही घेत आहात हे विसरू नका, असे देखील सौमित्र खान म्हणाले होते.
हे ही वाचा :Nilesh Lanke : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले निलेश लंके कोण ?
बिष्णुपूरमध्ये टीएमसी संपली आहे. ती समस्या नाही. मी 2011 पासून बिष्णुपूरसाठी काम करत आहे. मी माझ्या राजकीय कारकिर्दीला 2006 पासून सुरुवात केली, तेव्हापासून तेथील लोक मला ओळखतात. माझ्या विजयाचे अंतर 3 लाख मतांचे असेल, असा विश्वास सुजाता मंडल यांनी व्यक्त केला आहे. तसेच सुजाता मंडल यांनी आपल्या माजी पतीने मतदारसंघात कोणतेही काम केले नसल्याचाही आरोप केला आहे. "मी त्यांना (खान) या जागेसाठी दावेदार मानत नाही." ते आधी काँग्रेस, नंतर टीएमसी, नंतर भाजप सोडणार होते. त्याने कोणतेही काम केले नाही आणि आम्ही याबद्दल बोलू, असे सुजाता म्हणाल्या आहेत.
दरम्यान आता या नवरा-बायकोच्या या लढाईत बिष्णुपूर मतदार संघातून कोण बाजी मारतो.हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT