Mood of The Nation : मोदी की गांधी, कुणाची सत्ता येणार? देशातील जनतेचा मूड काय ?

मुंबई तक

• 08:39 AM • 08 Feb 2024

Mood of The Nation : पंतप्रधान मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीही अस्तित्वात आली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आजतकने देशातील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले आहे.

मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीही अस्तित्वात आली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आजतकने देशातील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले आहे.

lok sabha election 2024 mood of the nation modi government onr congress rahul gandhi know the survey

follow google news

बातम्या हायलाइट

point

देशातील जनतेच्या मनात काय?

point

PM मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येणार काय?

point

काँग्रेस भाजपचा विजयरथ रोखणार काय?

Mood Of The Nation : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याचा दावा करेतय, तर काँग्रेस 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतेय. इतकेच नाही तर मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीही अस्तित्वात आली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आजतकने देशातील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले आहे.  (lok sabha election 2024 mood of the nation modi government onr congress rahul gandhi know the survey) 

हे वाचलं का?


असे होणार सर्वेक्षण 

सकाळी 11 वाजता लखनऊ मधून अंजना ओम कश्यप उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील सर्वेक्षणाची माहिती देतील.

दुपारी 12 वाजता चंदीगडमधूव नेहा बाथम पंजाब, हरियाणा, हिमाचल, जम्मू आणि काश्मीरमधील लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर चर्चा करतील.

पुन्हा दुपारी 1 वाजता भोपाळवरून सईद अन्सारी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील नागरीकांचा काय मूड असणार आहे, हे सांगतील. 

दुपारी 2 वाजता बंगळुरूवरून अर्पिता आर्य तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ मधील नागरिकांमध्ये झालेल्या सर्व्हेवर चर्चा करतील.

दुपारी 3 वाजता आशुतोष दिल्लीतील जनतेच्या मूडवर चर्चा करतील. 

मुंबईतून संध्याकाळी 4 वाजता मुंबई तकचे संपादक साहिल जोशी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मधील नागरिकांच्या मूडवर चर्चा करतील.


'या' राज्यात मोदी सरकार 

देशातील 28 राज्ये आणि विधानसभेसह 2 केंद्रशासित प्रदेशांसह, अशी एकूण 17 राज्ये आहेत जिथे भाजप किंवा त्यांची आघाडी एनडीए सत्तेत आहे. त्यापैकी 11 राज्यांमध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे.या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, यूपी, उत्तराखंड, गुजरात, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर देशातील 6 राज्यांमध्ये भाजपसह एनडीएची सत्ता आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा, मेघालय, सिक्कीम, नागालँड आणि बिहार यांचा समावेश आहे.

काँग्रेसची सत्ता कोणत्या राज्यात? 

आता काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर फक्त तीन राज्यात त्यांचे सरकार आहे. ही राज्ये कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा आहेत. याशिवाय काँग्रेस दोन राज्यांतील आघाडी सरकारमध्ये सहभागी आहे. ही राज्ये आहेत- झारखंड आणि तामिळनाडू. एकूण 8 राज्ये अशी आहेत जिथे भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्ष सत्तेत आहेत. पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ, मिझोराम आणि पुद्दुचेरी (केंद्रशासित प्रदेश) ही राज्ये आहेत.

    follow whatsapp