Constituency Wise BJP Candidates List: कोल्हापूर दक्षिणमधून भाजपने दिलं 'या' दिग्गज नेत्याला तिकीट, पाहा कोण आहे उमेदवार?

मुंबई तक

20 Oct 2024 (अपडेटेड: 20 Oct 2024, 06:54 PM)

Maharashtra Assembly Election 2024: भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. जाणून घेऊयात कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघासाठी भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे.

maharashtra assembly election 2024 constituency wise bjp declare 99 candidates first list amal mahadik kolhapur south

Constituency Wise BJP Candidates

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली पहिली यादी

point

भाजपने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात कोणाला दिली उमेदवारी

point

भाजपने 99 उमेदवारांची यादी केली प्रसिद्ध

Maharashtra Assembly Election 2024 | Constituency Wise BJP Candidates List: कोल्हापूर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 99 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.  यामध्ये आता कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून कोणाला उमेदवारी जाहीर केली आहे? हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2024 constituency wise bjp declare 99 candidates first list amal mahadik kolhapur south candidancy declare) 

हे वाचलं का?

कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचा उमेदवार कोण? 

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले अमल महाडीक यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी अमल महाडीक यांचा 42 हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवानंतर देखील भाजपने अमल महाडीक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून त्यांना तिकीट दिलं आहे. 

हे ही वाचा : BJP Candidates List: सर्वात मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर, 99 उमेदवारांची नावं वाचा एका क्लिकवर 

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. 

महाराष्ट्राची सत्ता राखण्याचं भाजप समोर आव्हान 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप युतीला भरभरून मतदान केलं होतं. त्यामुळे त्यांचे विक्रमी खासदार निवडून आले होते. मात्र, 2024 निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने सपशेल नाकारलं. 

हे ही वाचा : BJP Candidate List : किती विद्यमान आमदारांना संधी, कुणाला डच्चू? भाजपच्या यादीचं10 मुद्द्यांमध्ये विश्लेषण

लोकसभेतील कामगिरी ही भाजपसाठी एका अर्थाने धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी भाजपने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच परिणिती म्हणजे आजची ही पहिली यादी आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत.
 

    follow whatsapp