Ajit Pawar 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत...'; अजित पवार यांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?

रोहिणी ठोंबरे

16 Nov 2024 (अपडेटेड: 16 Nov 2024, 02:27 PM)

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले? 

point

अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदावरून मोठं विधान!

point

'...विलासराव देशमुख बेस्ट'; अजित पवारांनी केलं तोंडभरून कौतुक!

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या दणक्यात सुरू आहे. महायुती vs महाविकास आघाडी अशी यंदाची लढत खूपच चुरशीची पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असतानाही कोणाचं सरकार निवडणून येईल याचा अंदाज लावणं अशक्य आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजितदादा मुख्यमंत्रीपदावरून बोलले आहेत. (maharashtra assembly election 2024 mahayuti ncp ajit pawar on cm post he said i am not in the race the cm will be decided after results are out)

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले? 

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना कौटुंबिक राजकारण आणि काका शरद पवार यांच्यासोबतचे मतभेद यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर, अजित पवारांनी 'आमच्या कौटुंबिक बाबींवर माझ्याकडे कोणतीही प्रतिक्रिया नाही. माझे संपूर्ण लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे', अशा स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.

हेही वाचा : Sanjay Raut: "देवेंद्र फडणवीसांना उपचारांची गरज..."; खासदार संजय राऊतांची घणाघाती टीका

पुढे, विधानसभा निवडणुकीच्या निकाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले, 'महायुती एकजुटीने लढत आहे. 175 चा टप्पा ओलांडणे अवघड नाही. सत्ता कायम ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. महायुतीने लोकप्रिय योजनांची मालिका जाहीर केली आहे. आम्ही सर्व योजनांसाठी 76,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. एकूण बजेट 6.5 लाख कोटी रुपये आहे, तर पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याजासाठी 3.5 लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे खर्चासाठी आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे मला वाटते.'

अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदावरून मोठं विधान!

मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्र्यांचा निर्णय निवडणूक निकालानंतर महायुतीच्या आमदारांच्या बैठकीत होईल.'

हेही वाचा : Gold Rate Today : लग्नसराईच्या धामधुमीत सोन्याचे दर प्रचंड घसरले! आजचा 24 कॅरेटचा भाव किती?

'...विलासराव देशमुख बेस्ट'; अजित पवारांनी केलं तोंडभरून कौतुक!

तुम्ही अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे, तुम्हाला सर्वात बेस्ट कोण वाटतं? यावर अजित पवार म्हणाले, 'ही वस्तुस्थिती आहे की मला अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली आहे. मला वाटतं दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख सर्वात चांगले मुख्यमंत्री होते. आपण युती आघाडी सरकारच्या काळात आहोत. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर एका पक्षाचं सरकार येण्याची शक्यता नाही. देशमुख यांनी आघाडी सरकार चालवण्याचं धोरण विकसित केलं होतं.'


 

    follow whatsapp