PM Modi: 'मी नतमस्तक होऊन माफी मागतो', शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी PM मोदींचा माफीनामा

मुंबई तक

30 Aug 2024 (अपडेटेड: 30 Aug 2024, 04:21 PM)

PM Modi Apologise for shivaji statue collapse: सिंधुदुर्गातील राजकोट येथील शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्या प्रकरणी आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितली आहे.

Maharashtra-news-pm-modi-apologise-for-Shivaji-statue-collapse palghar vadhavan port

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिंधुदुर्गातील घटनेवर PM मोदींचा माफीनामा

point

'मी नतमस्तक होऊन माफी मागतो'

point

छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे.

PM Modi Apologise for shivaji statue collapse : :सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर माफी मागितली आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी त्याच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो'', असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सिंधुदुर्ग घटनेवर (Shivaji Maharaj Statue) म्हणाले आहेत. (Maharashtra-news-pm-modi-apologise-for-Shivaji-statue-collapse palghar vadhavan port)

हे वाचलं का?

पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गात घडलेल्या घटनेवर भाष्य केलं. ''भापजने जेव्हा मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जेव्हा घोषित केलं होतं. तेव्हा मी सर्वात आधी  रायगडच्या किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. अशाप्रकारे मी आराध्य दैवताचा आशिर्वाद घेऊन राष्ट्रसेवेच्या यात्रेस सुरूवात केली होती'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरूवातीला सांगितले. 

हे ही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण पुतळा दुर्घटनेत पहिला आरोपी गजाआड, चौकशीतून नवीन माहिती समोर येणार?

''छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या साथिदारांसाठी फक्त नाव नाही आहे. ते फक्त राजा, महाराजा आणि राजपुरूष मात्र नाही आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी आज शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो'',असे विधान करून पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्ग घटनेवर माफी मागितली आहे. तसेच ''छत्रपती शिवाजी महाराजांना जे लोक आपले आराध्य दैवत मानतात. त्यांच्या हृदयात या घटनेने जी जखम झाली आहे. अशा आराध्य दैवताची पुजा करणाऱ्यांची मी डोकं टेकवून माफी मागतो'', अशाप्रकारे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची देखील माफी मागितली आहे. 

हे ही वाचा : महायुतीत रंगलं महाभारत! तानाजी सावंतांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यानंतर NCP ला संताप अनावर!

''भारताचे महान सपुत वीर सावरकर यांना शिव्या देतात. अपमानीत करतात असे लोक आम्ही नाही आहोत. देशभक्ताच्या भावनांचा चुराडा करतात. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही, कोर्टात जातात, पण त्यांना पश्चाताप होत नाही. हे यांचे संस्कार आहेत. आणि मी शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो. हे माझे संस्कार आहेत. माझ्यासाठी माझ्या आराध्य दैवतापेक्षा कोणी मोठा नाही आहे'',असे विधान करून पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला आहे.

पालघरच्या वाढवण बंदरावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''आज देशात जितके कंटेनर पोर्टवर येतात जातात ना, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनवर ठेवण्याची क्षमता एकट्या वाढवण बंदराकडे असणार आहे. तुम्ही अंदात लावू शकत नाही, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराच्या औद्योगिक प्रगतीचा किती मोठं केंद्र बनणार आहे, असे मोदींनी सांगितले आहे. 

    follow whatsapp