Devendra Fadnavis On Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षानी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. मतदार संघाची चाचपणी आणि जोरबैठका सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) तर विधानसभेच्या (Vidhan Sabha) 154 जागा निवडून येतील, असा दावा केला होता. या दाव्यानंतर आता महायुतीकडून (Mahayuti) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकता येतील? याचा थेट आकडाच सांगून टाकला आहे. नेमकं फडणवीसांनी काय आकडा सांगितला आहे? हे जाणून घेऊयात. (mahayuti will win 200 seat in maharashtra assembly election 2024 devendra fadnavis statement)
ADVERTISEMENT
महायुतीची षण्मुखानंदमध्ये शासकीय योजना, अंमलबजावणी संदर्भात बैठक पार पडली आहे. या बैठकीतून देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू, असा विश्वासही व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरकारी योजनांची माहिती देत कार्यकर्त्यांच्या कानपिचक्याही घेतल्या आहेत.
हे ही वाचा : मुंबईत 1 कोटीचा फ्लॅट, ऑडी कार..., अट्टल चोराची लाईफस्टाईल पाहून पोलीस थक्क!
सकाळी 9 वाजता येऊन ते काय वेड वाकडं बोलून जातील दिवसभर त्या वेड्या वाकड्यावर माध्यम चालतील. या ट्र्रॅपमध्ये फसण्याची गरज नाही. आपण जे काम केलं आहे त रोज बोललं पाहिजे. वारंवार बोललं पाहिजे. पब्लिक मेमरी शॉर्ट असते, ते काल बोलले आज विसरतात, जे चांगलं केलंय ते रोज सांगा, असा सल्ला देखील फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला. विरोधक सावत्र भावासारखे आपल्या योजनेचा विरोध करतात आणि सख्खे भाऊ असल्याचा आवं आणतात. पण आता यांचीच लोक गावागावात फॉर्म घेऊन उभे आहेत. त्यांच्यात खिशातून पैसे देणार आहेत, असे घरोघरी फिरु लागले आहे, त्यामुळे अशा बेगडी भावांपासून सावध राहावे लागेल, असा सल्ला देखील फडणवीसांनी महिलांना दिला.
हे ही वाचा : Eknath Shinde : शिंदेंची रणनीती भाजपलाच देणार धक्का? ठाण्यात 'या' मतदारसंघासाठी जोरबैठका सुरू
लाडकी बहिण योजनेतील सगळ्या अटीशर्थी काढून टाकल्या आहेत. रहिवासी दाखला आणि उत्पनाचा दाखल्यासाठी रांग लावायची गरज नाही. त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड द्यावे आणि ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही त्यांनी सेल्फ सर्टीफिकेशन (हमीपत्र) करायचं आहे. तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, असे फडणवीसांनी सांगितले आहे.
या योजनेत सध्या ऑफलाईन, अॅपवरही फॉर्म भरले जातायत. या दरम्यान फॉर्म भरताना बँकेचे अकाऊंट नंबर लिहताना चुक करू नका, नाहीतर पैसै जमा होणार नाहीयेत, असे देखील फडणवीसांनी महिलांना सांगितले आहे.
ADVERTISEMENT