Manoj Jarange : मनोज जरांगेंचा सरकारला नवीन अल्टिमेटम, 'या' तारखेला पुन्हा बसणार उपोषणाला

मुंबई तक

13 Jul 2024 (अपडेटेड: 13 Jul 2024, 11:20 PM)

Manoj Jarange Silent Rally : मनोज जरांगे यांनी दिलेल्या मुदतीची वेळ आज संपत असून संभाजीनगरमधून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला याची आठवण करुन दिली आहे.

manoj jarange gave new ultimatum to mahayuti government hunger strike silent rally end chhatrapati sabhaji nagar

शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला.

follow google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळच्या नादी लागू नका

point

फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं

point

288 पाडायचे की उभे करायचे हे ठरवू

Manoj Jarange Silent Rally : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. त्याचसोबत जरांगेनी सरकारला दिलेला वेळ देखील संपला होता, याची राज्य सरकारलाआठवण करुन दिली आहे. तसेच, सरकारने काही तो निर्णय घ्यावा, अन्यथा 20 जुलैपासून आपण पुन्हा उपोषणलाा बसणार असल्याची घोषणाच त्यांनी केली. (manoj jarange gave new ultimatum to mahayuti government hunger strike silent rally end chhatrapati sabhaji nagar) 

हे वाचलं का?

लाखोंनी जमलेल्या मराठ्यांसमोर सरकारला जाहीर सांगतो, आजची रात्र  सरकारच्या हातात आहे. फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं, त्या छगन भुजबळच्या नादी लागू नका, उद्या दुपारी वाखरी येथे रिंगण सोहळ्याला मला तुकोबारायांच्या दर्शनाला जायचं आहे. मी उद्याच उद्या निर्णय घेणार होतो, पण उद्या दर्शनाला जात आहे. 18 आणि 19 तारीख दोनच दिवस माझ्या हातात आहेत, पुन्हा 20 तारखेला मी आमरण उपोषण करणार आहे. मी स्थगित केलेलं उपोषण 20 तारखेला पुन्हा सुरू करणार असून त्याचदिवशी उमेदवार द्यायचे का नाही हे ठरवणार, असल्याचे जरांगे यांनी म्हटलं. 

हे ही वाचा : Pooja Khedkar : 40 कोटींची संपत्ती असताना नॉन-क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र कसे मिळाले? पूजा खेडकरचे वडील म्हणाले...

सरकार ला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे, 20 तारखेला तारीख जाहीर करू, त्या दिवशी 288 पाडायचे की उभे करायचे हे ठरवू आणि मुंबईला कधी जायचे हेही ठरवू, असेही जरांगे यांनी जाहीर केले. नुसता मराठवाडा निघाला तर यांचे दंडुके काहीच काम करणार नाहीत, असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला. 

दरम्यान याआधी  राज्य सरकारच्यावतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे 2 महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, मनोज जरांगे यांनी 1 महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत सगेसोयरे आणि मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. जरांगे यांनी दिलेल्या मुदतीची वेळ आज संपत असून संभाजीनगरमधून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला याची आठवण करुन दिली आहे. 

    follow whatsapp