Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

मुंबई तक

09 Sep 2024 (अपडेटेड: 09 Sep 2024, 09:07 AM)

Chhtrapati Sambhaji Raje On Manoj Jarange Patil : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला असून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर राजकीय नेतेमंडळींच्या नजरा लागल्या आहेत.

Chhatrapati Sambhaji Raje Meets Manoj Jarange Pat

Chhatrapati Sambhaji Raje Meets Manoj Jarange Pat

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजी राजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकीबाबत खलबतं

point

छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत जरांगेंबाबत नेमकी काय चर्चा झाली?

point

मनोज जरांगे यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभाजे राजेंनी केेलं मोठं विधान

Chhtrapati Sambhaji Raje On Manoj Jarange Patil : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला असून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर राजकीय नेतेमंडळींच्या नजरा लागल्या आहेत. मराठा समाजाचे प्रश्न खांद्यावर घेऊन सरकारवर निशाणा साधणारे मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढणार की नाही? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान संभाजी राजे यांनी जरांगे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे यांना घेण्यासाठी माझा प्रयत्न आहे, त्यासाठीच मी त्यांना भेटलो असल्याचं संभाजी राजे माध्यमांशी बोलताना म्हणाले. (All the parties have started building a strong front for the upcoming assembly elections. Suddenly the issue of Maratha reservation has become a hot topic and Manoj Jarange Patil's followers are in the eye of government leaders)

हे वाचलं का?

छत्रपती संभाजी राजे पुढे म्हणाले,राज्य सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात कसे टिकेल, यावरही छत्रपती संभाजी महाराज यांनी शंका उपस्थित केली आहे.  शाहू महाराजांनी जसं आरक्षण दिलं होतं त्या पद्धतीने मी आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार. माझ्या हातात राज्य आलं पाहिजे.
महाराष्ट्र विधानसभेत येणाऱ्या निवडणुकीत मराठा नेते मनोज जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीत यावं, त्यांना आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली असल्याचं वक्तव्य छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : अजित पवारांचा बारामती दौरा रद्द! अचानक मुंबईत का झाले दाखल?

सध्या सगळे प्रश्न बिकट आहेत. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं, असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. तसेच राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात कसे टिकतेॉ, याबाबतही मला शंका आहे. फार गुंतागुंतीचा प्रश्न असल्याचे सांगत संभाजी महाराज यांनी राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणावर हा प्रश्न उपस्थित केला आहे. एव्हढेच नाही, माझ्या हातात राज्य आल्यानंतर आरक्षणाचा गुंता मी सोडवतो.

मी छत्रपती शाहू महाराजांचा नातू आहे. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे त्यांनी जसं आरक्षण दिलं होतं. तसा देण्याचा प्रयत्न करू शकतो असेही छत्रपती संभाजी महाराज म्हणाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी आज तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. ते पुढील दोन दिवस मराठवाड्यात ओल्या दुष्काळाचे पाहणीसाठी करणार आहेत, असंही छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

    follow whatsapp