Maratha Reservation : ‘…म्हणून तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागला’, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार

इम्तियाज मुजावर

18 Nov 2023 (अपडेटेड: 19 Nov 2023, 02:47 AM)

जी व्यक्ती घटनेच्या मोठ्या पदावर बसली असताना कायदा पायदळी तुडवत आहे, त्या व्यक्तीची लायकी राज्यातील लोकांनी ओळखली आहे. पण मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे तेवढी त्यांची लायकी नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.

manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservation cm eknath shinde obc reservation

manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservation cm eknath shinde obc reservation

follow google news

Manoj jarange Patil Reply Chhagan Bhujbal : ‘मी छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन-भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो. पण स्व:कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.’ असं म्हणत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर अत्यंत जहरी असा वार केला आहे.सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर केली होती. या टीकेवर आता जरांगे पाटलांनी भुजबळांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टाचा पैसा ओरबाडून खाल्लात म्हणूनच तुम्हाला तुरुंगात जावे लागले, अशी टीका जरांगेनी केली. (manoj jarange patil reply chhagan bhujbal maratha reservation cm eknath shinde obc reservation)

हे वाचलं का?

सातारा येथील गांधी मैदानावर जाहीर सभेत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या टिकेचा चांगलाच समाचार घेतला. जी व्यक्ती घटनेच्या मोठ्या पदावर बसली असताना कायदा पायदळी तुडवत आहे, त्या व्यक्तीची लायकी राज्यातील लोकांनी ओळखली आहे. पण मराठ्यांनी त्यांच्यावर बोलावे तेवढी त्यांची लायकी नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. मी दिसायला बारीक असलो तरी माझ्या टप्प्यात आला की वाजवतोच, असा टोलाही त्यांनी हाणला. तसेच माणसाचे वैचारिक मतभेद असावेत, पण आपण कोणत्या पदावर आहोत, त्याची गरीमा राखून त्यांनी बोलावे. त्यांच्याकडे राज्याचे पालकत्व आहे, त्यांनी भान ठेवावे. मी पाचवी शिकल्याचे ते सांगतात. पण सरकारने माझे शिक्षण किती आहे, यावरच तीन दिवस घातलेत, हे लक्षात घ्यावे.

हे ही वाचा : IND vs AUS Final : मोहम्मद शमी अ‍ॅडम झाम्पात होणार खरी ‘फायनल’, कोण आहे पुढे?

जरांगे-पाटील पुढे म्हणाले, आधी तुम्ही मुंबईत काय होता आणि काय विकत होता, तुम्ही कोणच्या पाहुण्याकडे राहून जगलात, हे सर्वांना ठाऊक आहे. तुमच्याकडे काहीही नव्हते आणि एवढी संपत्ती कशातून आली हे सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टाचा पैसा ओरबाडून खाल्ला म्हणूनच तुम्हाला तुरुंगात जावे लागले, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

महात्मा फुले, राजर्षि शाहू, यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला एक वेगळा आदर्श दिला. किमान महात्मा फुले यांचा आदर्श त्यांनी स्वत:समोर ठेवून त्यांनी बोलायला हवे होते. जाती-जातीत दंगली घडवण्याची भाषा केली जाते. परंतु, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यात कोणतीही तेढ निर्माण होवू द्यायची नाही, या राज्यात शांतता राहिली पाहिजे, ही जबाबदारी मराठ्यांनो, तुमच्या खांद्यावर आहे. मराठे आरक्षणात गेले हे लक्षात आल्यानेच जातीय दंगली घडतील, अशी वक्तव्ये करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव असल्याचे जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.

    follow whatsapp