''तुतारी' चिन्ह बिंबवण्याचं काम सोपं...', भुजबळांनी शक्यता सांगितल्या

मुंबई तक

• 01:47 PM • 23 Feb 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी राजकीय पक्षाचे चिन्ह आणि त्यावर होणाऱ्या राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार म्हणजे घड्याळ हेच चित्र लोकांच्या मनावर होतं त्यामुळे त्याचाही परिणाम राजकीय पक्षावर होतो असंही त्यांनी सांगितलं.

Chhagan Bhujabal

Chhagan Bhujabal

follow google news

बातम्या हायलाइट

point

'तुतारी हे चिन्हं बिंबवण्याचं काम सोपं नाही'

point

शरद पवार म्हणजे घड्याळ हेच लोकांच्या डोक्यात

NCP Sharad Pawar: अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP sharadchandra pawar) पक्षाला कोणतं चिन्ह (Symbol) मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले. 

हे वाचलं का?

शरद पवार म्हणजे घड्याळ

शरद पवार गटाला चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झालेले मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, 'शरद पवार म्हणजे घड्याळ हे चित्र लोकांच्या मनावर बिंबले गेले आहे. त्यामुळे आता तुतारी चिन्ह बिंबवण्याचं काम सोपं नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.'

लोकांच्या मनात प्रतिमा तयार

मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाला मिळालेले त्यांच्या पक्षाचे चिन्हं आता लोकांच्या मनावर बिंबवायला सोपं नाही. कारण अनेक लोकांच्या आणि ग्रामीण भागातील लोकांच्या मनावर एक चित्र निर्माण झालेले असते. 

मोबाईल, टीव्ही आहे पण...

शरद पवारांविषयी लोकांच्या मनात एक त्यांची प्रतिमा तयार झाली आहे की, '1999 पासून शरद पवार म्हणजे घड्याळ हे लोकांच्या डोक्यात असले तरी आता हे चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवणे सोपे नाही. मात्र सध्याच्या काळात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक मीडिया याद्वारे ते सोपेही आहे' असं सांगत त्यांनी 1999 नंतरच्या निवडणुकीतीलही एक किस्सा सांगितला.

गोष्ट 1999 च्या पक्षांतराची 

'शरद पवारांनी ज्यावेळी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष काढला. त्यावेळी निवडणुका झाल्या, त्यावेळी लोकांना आम्ही विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही मतदान शरद पवारांनाच केले. त्यांना चिन्ह विचारल्यानंतर ते म्हणाले की, हाताच्या चिन्हाला मतदान केले. त्यामुळे राजकीय पक्षांचे चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवणे सोपं नाही मात्र सध्याच्या काळात ते सोपंही झालं असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp