Shivsna-BJP: राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघालं असतानाच शिंदे गटातील मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्या भावाच्या नाराजीनाट्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. कारण मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत (Kiran Samant) यांनी थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून चाललेलं नाराजी नाट्य आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी कोकणातील लोकसभेच्या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उदय सामंत यांनीही किरण सामंतांसाठी शब्द टाकला होता. त्यामुळेच आता विजय वडेट्टीवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी, ‘अरे किरण, काल किती फोन केले, उचलले नाहीत’ असं मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताना किरण सामंत यांना म्हटले होते. त्यानंतर त्या व्हिडीओवर चर्चाही खूप झाली. कारण किरण सामंत सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी इच्छूक असल्यामुळेच आता वडेट्टिवारांच्या भेटीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हे ही वाचा >> Rishabh Pant : ‘मला वाटलं माझी वेळ संपली’, ऋषभ पंतने कार अपघाताचा सांगितला भयानक अनुभव
राजकीय वर्तुळात चर्चा
आगामी लोकसभेसाठी सगळ्याच राजकीय पक्षातून आता हालचाली चालू झाल्या आहेत. त्यामुळेच किरण सामंत आणि विजय वडेट्टीवार यांच्या भेटीमुळेही चर्चेला उधाण आले आहे. उदय सामंतांनीही शिंदेकडे शब्द टाकल्याने आता भाजप आणि शिंदे गटामध्ये नेमकं काय होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी रस्सीखेच
आगामी लोकसभेसाठी भाजपही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आग्रही असणार आहे. मात्र उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आता इच्छूक असल्याने भाजपचीही गोची झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात भाजप आणि शिंदे गटात या जागेसाठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र दिसून येणार आहे.
सामंत विरुद्ध राणे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर राणे पिता-पुत्रांकडूनही दावा केला जात आहे. त्यांच्यामुळेच भाज प आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. तर दुसरीकडे उदय सामंत यांनी जाहीरपणे सांगितले नसले तरी ते आपल्या भावासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांच्या भेटीमुळे आता नेमकं काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सामंत अनेक दिवसांपासून नाराज
उदय सामंत यांचे बंधू रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात प्रचंड अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. कारण रत्नागिरीतील अनेक कार्यक्रमामध्ये त्यांची असलेली उपस्थिती आणि त्यांच्या लोकसंपर्कामुळेच मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला होता. मात्र त्यानंतर कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्या नाराजीमुळेच किरण सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.
केसरकरांचंही समर्थन
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेसाठी उदय सामंत यांना आपल्या भावाला ही जागा मिळावी अशी इच्छा त्यांचीही आहे. त्यातच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही सामंतांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. त्यानंतरही केसरकरांनीही सांगितले होते, की शिंदे गटाचे उमेदवार हे किरण सामंतच असणार असंही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शिंदे गटाने सामंताची उमेदवारी नक्की केली असली तरी महायुतीतून ही जागा नेमकी कोणाला जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT