पणजी: ‘आम्ही शिंदे सरकारसोबत आहोत. शिंदे साहेबामुळेच आम्ही खरं तर उद्धव साहेबांना सोडून शिंदेंसोबत गेलो आता शिंदे साहेब भाजपसोबत जाणार हे माहीत नव्हतं. पण ते गेले.. मी नाराज होत नाही.. आणि झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.’ असं विधान प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात अद्यापही मंत्री पद न मिळालेल्या आमदार बच्चू कडू यांनी आता थेट गोव्याकडे आपलं लक्ष वळवलं आहे. गोवा (Goa) राज्यात आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करण्याची त्यांनी सुरुवात केली आहे. त्याच संबंधित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक विधानं केली आहेत. (mla bacchu gadu supported shinde government big statement goa bjp ncp ajit pawar shiv sena maharashtra politics news latest)
ADVERTISEMENT
‘राष्ट्रवादी सत्तेत आल्याने आमदारांमध्ये नाराजी…’
‘मी नाराज असण्याचं काही कारण नाहीए. कारण मला या सरकारमध्ये दिव्यांग मंत्रालय भेटलं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. लोकं मंत्रिपद मागत होते आम्ही मंत्रालय घेतलं. आता याचे अनेक मंत्री होतील. त्यामुळे नाराजीचं कारण नाही. पण एकंदरीत जे वातावरण सुरू आहे त्यामध्ये राष्ट्रवादीने आमचा घात केला, राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडतोय.. नवीन गट तयार केला.. पण आता पुन्हा राष्ट्रवादी त्यात सामील झाल्यामुळे जे काही आमदारांमध्ये नाराजी आहे ते आम्ही बोलून दाखवलं आहे. आता त्यांची मोठी गोची झाली आहे. आमदार सांगत होते की, आम्हाला राष्ट्रवादीने निधी दिला नाही. तीच राष्ट्रवादी आता सरकारमध्ये सामील होतेय तेव्हा अडचण निर्माण होतेय. म्हणून आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.’ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
‘मी नाराज होत नाही.. आणि झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही’
‘आम्ही शिंदे सरकारसोबत आहोत. शिंदे साहेबामुळेच आम्ही खरं तर उद्धव साहेबांना सोडून शिंदेंसोबत गेलो आता शिंदे साहेब भाजपसोबत जाणार हे माहीत नव्हतं. पण ते गेले.. मी नाराज होत नाही.. आणि झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.’ असं बेधडक विधान बच्चू कडू यांनी यावेळी केलं आहे.
‘भाजपने आपल्या स्वार्थासाठी पहिल्यांदा शिंदे गटाला आणि आता राष्ट्रवादीला सत्तेत घेतलं’
‘भाजपने आपल्या स्वार्थासाठी पहिल्यांदा शिवसेनेच्या शिंदे गट आणि आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतलं. मात्र, भाजपच्या या निर्णयामुळे त्यांच्यासोबत पहिल्यांदा आलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाची चांगलीच नाराजी आहे. भाजप नेहमी आपल्या फायद्याचा विचार करते मात्र त्यांच्या या निर्णयामुळे जनता नाराज होणार असून याचे परिणाम भाजपला भोगावे लागणार आहेत.’
हे ही वाचा>> Crime : मित्राच्या बायकोसोबत संबंध अन् झाला भयंकर अंत, तिसऱ्या मजल्यावरून…
‘भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतल्यामुळे पुन्हा एकदा आमची नाचक्की झाली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे आम्ही ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या समवेत गेलो त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पुन्हा एकदा काम करताना आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.’
‘मात्र जोपर्यंत मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत आमदारांच्या निधी वाटपावर कोणताही अन्याय होणार नाही आहे याची मला खात्री आहे.’ असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.
हे ही वाचा>> ‘सटर-फटर लोकांमुळे..’, ठाकरे गट सोडताच नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेवर केली टीका
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या आमदारांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांची देखील नाराजी आहे. माझ्याकडे तूर्तास दिव्यांग मंत्रालयाचा पदभार आहे त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे मी नाराज नाही. जर मी नाराज झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची दुर्दैवाची वेळ आमच्यावर आली आहे. असं देखील कडू पुढे म्हणाले.
कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने गोव्यात शिरकाव केला असून आगामी काळात दिव्यांग आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आम्ही गोव्यात काम करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
ADVERTISEMENT