Sunil Raut News : घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेबद्दल लक्षवेधी मांडण्यात आली होती. यावर चर्चा सुरू असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. राणे यांच्या आरोपानंतर राऊत भडकले आणि आरोप सिद्ध झाले तर सभागृहात राजीनामा देईन, असे आव्हान दिले. (MLA Sunil Rane challenged MLA Nitesh Rane.)
ADVERTISEMENT
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी लक्षवेधी मांडली. त्यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडेंचा संबंध काय असा सवाल करत चौकशीची मागणी केली.
नितेश राणेंनी काय आरोप केला?
चर्चेदरम्यान, आमदार नितेश राणे यांनी भावेश भिंडे यांना उद्धव ठाकरेंची भेट घडवून आणणारा व्यक्ती कोण? त्याला मातोश्रीवर कोण घेऊन गेले? असा प्रश्न केला.
राणे म्हणाले की, "भावेश भिंडे कुणाचा पार्टनर आहे? त्याला मातोश्रीवर घेऊन जाणारा आमदार कोण आहे? त्याची माहिती घेतली पाहिजे. भिंडे हा आमदार सुनील राऊत यांचा पार्टनर आहे."
हेही वाचा >> पिकनिक बेतली जीवावर, कुटुंबच गेले वाहून; व्हिडीओची संपूर्ण स्टोरी
"सुनील राऊत यांचा तो पार्टनर आहे. याची चौकशी झाली पाहिजे. मी मंत्र्यांना विनंती करतो की, आरोपी भिंडेचा सीडीआर तपासा. त्याचे लोकेशन बघा. त्याचा आणि आमदार सुनील राऊत यांचा काय संबंध आहे? याची चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
सुनील राऊत म्हणाले, इथे राजीनामा देतो
आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर सुनील राऊत म्हणाले की, "माझ्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. माझे चॅलेंज आहे की, जो भावेश भिंडे आहे. त्याच्या बाबतीत माझा कुठेही एक रुपयाचा व्यवहार असेल, तर मी या ठिकाणी राजीनामा देईन."
हेही वाचा >> जानकरांनी महायुतीची वाढवली चिंता, भाजप कसा काढणार तोडगा?
"ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. माझे नाव घेऊन आरोप केले आहेत. त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजीनामा देईन. नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, ज्यावेळी भावेश भिंडे पळाला, त्याचा मोबाईल तपासा. त्याला शेवटचा कॉल कुणाचा आला? पोलिसांकडे चौकशी करा. होर्डिंग पडल्यानंतर त्याला शेवटचे जे चार फोन आले, ते मुलुंडच्या एका माजी खासदाराचे होते", असे म्हणत सुनील राऊत यांनी किरीट सोमय्यांवर नाव न घेता आरोप केला.
ADVERTISEMENT