Raj Thackeray : ज्या वेळी काँग्रेसने इंडिया आघाडीची स्थापना केली होती, त्या वेळी भाजपची एनडीए आघाडी कमकुवत होताना दिसत होती. पण भारतातील अनेक घटना घडमोडींमुळे एनडीएमध्ये (NDA) मात्र सुधारणा होताना दिसून आली. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भाजपकडून (BJP) प्रत्येक पक्षाला एनडीएमध्ये सामील करून घेण्यात येऊ लागले. ज्या पक्षांचे कधी ना कधी भाजपशी संबंध होते.
ADVERTISEMENT
राज ठाकरे आणि एनडीए
भाजपच्या याच रणनीतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेही आता सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील भाजपचे नेते आशिष शेषर यांच्याबरोबर तासभर चर्चा केली आहे. त्यामुळे आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांच्याही एनडीएमध्ये सहभाग होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
नात्यात वितुष्ठ
राज ठाकरे हे ठाकरे घराण्यातील असल्यामुळे त्यांचा एक वेगळा प्रभाव राज्यातील राजकारणावर आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितले जाते की, राज ठाकरे हे एकनाथ शिंदे होऊ शकत नाहीत. कारण ते त्यांचे भाऊ आहेत. कारण 2005 साली जेव्हा उद्धव आणि राज यांच्यामध्ये वितुष्ठ आले तेव्हा त्यांनी शिवसेनेवर आणि चिन्हावर कोणताही दावा सांगितला नाही. त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष निर्माण केला आणि त्याचे नाव ठेवले महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यामध्ये ना ठाकरे घराण्याचे नाव होते, ना शिवसेना होती.
राजकीय दावेदार नाही
महाराष्ट्रा नवनिर्माण सेना मुंबईत किंवा महाराष्ट्रात कधीच राजकीय दावेदार बनू शकली नाही हे ही कोणी नाकारू शकत नाही. ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदा निवडणूक लढविण्यात आल्या त्यावेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवून देखील मनसेला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते.
हे ही वाचा >> भाजपला सुप्रीम कोर्टाचा झटका! विनोद तावडेंची रणनीती फसली
बाळासाहेबांचे उत्तराधिकारी
राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेने बघितले जाते. कारण बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रिय असताना राज ठाकरे हेच त्यांचे उत्तराधिकारी मानले जात होते. मात्र ज्यावेळी 2005-06 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना आणि ठाकरे घराण्याचा वारसा निवडायचा होता त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना निवडले नाही तर मुलगा उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले. त्या क्षणापासून राज ठाकरे ठाकरे कुटुंबीयांपासून दुरावले गेले आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरेंपासून दुरावले गेले. आज घडीला 20 वर्षे उलटून गेली असली राज ठाकरे आपल्या राजकीय भूमिकेपासून आणि राजकीय धोरणापासून एक इंचही मागे हटले नाहीत.
राजकीय वजन
राज ठाकरेंनी मनसेचं चिन्ह, त्याचा रंग बदलला पण फार त्याचा काही परिणाम झाला नाही. तरीही मुंबईत म्हणावा तसा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, तरीही राज ठाकरेंचं राजकीय वजन कमी झालं नाही. राज ठाकरे कधीच कोणाच्या घरी कोणाला भेटायला जात नाहीत. गौतम अदानी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जावे लागते. फक्त कोणी जात नसेल तर ते आहेत उद्धव ठाकरे.
ठाकरेंचा खरा वारसा
राज ठाकरेंना आपल्या पक्षात आणण्याची ही भाजपची खेळी काही पहिल्यांदाच होते असं नाही. यापूर्वीही असे अनेक घटना अशा घडल्या आहेत. भाजपने शिवसेनेसोबत एकनाथ शिंदे यांना आणले मात्र ठाकरेंचा जो खरा वारसा होता त्यांनाच पुढं आणता आलं नाही.
फटका उद्धव ठाकरेंना
राज ठाकरेंसोबत युती करून भाजपला मतांचा फायदा कमी होतो पण ठाकरेंच्या वारसा म्हटले की, त्याचा फायदा अधिक होतो. राज ठाकरे भाजपला मोठा फायदा करून देतीन न देतील मात्र त्यांचा खरा फटका उद्धव ठाकरेंना होऊ शकतो हे मात्र खरं आहे.
ADVERTISEMENT