News about Mohan Yadav : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मोहन यादव यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते. खरंतर भारतीय कुस्ती संघटनेसाठी चार उपाध्यक्ष निवडले जाणार होते. मोहन यादव हेही या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले नव्हते, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पहिला धक्का बसला.
ADVERTISEMENT
13 डिसेंबर 2023 रोजी मोहन यादव मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेली होती. कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीत पश्चिम बंगालचे असित कुमार साहा, पंजाबचे कर्तार सिंग, मणिपूरचे एन फोने आणि दिल्लीचे जयप्रकाश हे उपाध्यक्षपदी निवडून आले. या निवडणुकीत मोहन यादव यांचा पराभव झाला. त्यांना केवळ पाच मते मिळाली.
हेही वाचा >> “मोठं घर दिलं, दरवाजाही मोठा, पण…”, जरांगेंनी महाजनांसमोरच शिंदे सरकारला सुनावलं
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव सध्या मध्य प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. संजय सिंग यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात.
कोण कोणत्या पदासाठी लढले आणि किती मते मिळाली?
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील संजय कुमार सिंह हे निवडून आले आहेत. त्यांना 40 मते मिळाली आहेत. त्याचबरोबर ओडिशातून निवडणूक लढवणाऱ्या अनिता यांना केवळ सात मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. तसेच वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या आसामच्या देवेंद्र यांना 32 तर गुजरातच्या आय.डी. नानावटी यांना 15 मते मिळाली.
उपाध्यक्षपदासाठी चार जणांची निवड होणार होती. पंजाबचे कर्तारसिंग यांना 44 मते मिळाली. पश्चिम बंगालच्या असितकुमार साहा यांना 42 मते मिळाली. मणिपूरच्या एन. फोनी यांना 38 मते मिळाली. दिल्लीचे जय प्रकाश यांना 37 मते मिळाली. खासदार डॉ.मोहन यादव यांना अवघी पाच मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला.
हेही वाचा >> काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यामध्ये ठिणगी! वडेट्टीवार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांवर भडकले
त्याचप्रमाणे प्रधान सचिवपदासाठी गुजरातचे प्रेमचंद लोचब यांना 27 तर चंदीगडच्या दर्शन लाल यांना 19 मते मिळाली. संयुक्त सचिवपदासाठी आंध्र प्रदेशचे आरके पुरुषोत्तम यांना 36 मते, कर्नाटकचे बेलीपाडी गुणरंजन शेट्टी यांना 34 मते, हरियाणाचे रोहतश सिंग यांना 10 तर हिमाचल प्रदेशचे कुलदीप सिंग यांना 9 मते मिळाली.
खजिनदारपदासाठी उत्तराखंडचे सत्यपाल सिंग देसवाल यांना 34 तर जम्मू-काश्मीरचे दुष्यंत शर्मा यांना 12 मते मिळाली. कार्यकारिणी सदस्यपदासाठी निवडणूक लढविणारे छत्तीसगडचे प्रशांत राय यांना 37 मते, झारखंडचे रजनीश कुमार यांना 37 मते, तामिळनाडूचे एम. लोगनाथन यांना 36 मते, नागालँडचे नवीकुओली खात्सी यांना 35, उम्मेद सिंग यांना 35 मते मिळाली. राजस्थानमधून 34, आसामच्या रतुल सरमा यांना 37 मते, 9 आणि जम्मू-काश्मीरच्या अजय वैद यांना 8 मते मिळाली.
ADVERTISEMENT
