Mood of the Nation: मविआ फोडली, पण महाराष्ट्रात भाजपला फक्त…

मुंबई तक

• 04:23 PM • 24 Aug 2023

Mood of the Nation: देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज मूड ऑफ द नेशन सर्व्हेतून वर्तवला जात आहे. पण महाराष्ट्रात मात्र, भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

mood of the nation survey predicts bjp will get only 20 seats in maharashtra lok sabha election 2024 shinde and ajit pawar group can win only 5 seats

mood of the nation survey predicts bjp will get only 20 seats in maharashtra lok sabha election 2024 shinde and ajit pawar group can win only 5 seats

follow google news

Mood of the Nation Maharashtra: मुंबई: लोकसभा 2024 निवडणुकासाठी (Lok sabha 2024) आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. याच निमित्ताने इंडिया टुडेने नुकताच देशाचा नेमका मूड काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘मूड ऑफ द नेशन’ हा सर्व्हे केला होता. ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्रातील जनतेने अगदी इंटरेस्टिंग असा कौल दिला आहे. (mood of the nation survey predicts bjp will get only 20 seats in maharashtra lok sabha election 2024 shinde and ajit pawar group can win only 5 seats)

हे वाचलं का?

आज घडीला महाराष्ट्रात जर लोकसभा निवडणुका झाल्या तर महायुतीच्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला मिळून 41 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, 2024 च्या निवडणुकीत महायुतीला तब्बल 21 जागांवर फटका बसू शकतो.

सर्व्हेनुसार, महायुतीला (भाजप+शिंदे गट+अजित पवार गट) यांना एकूण 20 जागांवरच विजय मिळू शकतो. त्यापैकी भाजप 15 जागांवर विजय मिळवेल तर शिंदे आणि अजित पवार गटाला मिळून फक्त पाचच जागा जिंकता येतील असा सर्व्हेत अंदाज आहे.

मूड ऑफ द नेशन: महाराष्ट्रातील नेमकी राजकीय स्थिती काय असणार?

1. मविआ फोडल्याचा भाजपला महाराष्ट्रात फायदा होणार?

सर्व्हेनुसार 60 टक्के लोकांना वाटतं की, भाजपने मविआ फोडल्याचा त्यांना फायदा होईल. तर 25 टक्के लोकांना वाटतं की, भाजपला या गोष्टीचा फायदा होणार नाही.

2. लोकसभा निवडणुका आज झाल्यास महाराष्ट्रात कशी असेल मतांची टक्केवारी?

आज घडीला लोकसभेच्या निवडणुकी झाल्यास महाराष्ट्रात महायुतीला 40 टक्के मतदान होऊ शकतं तर महाविकास आघाडीला 45 टक्के मतदान होईल.

3. लोकसभा निवडणुका आज झाल्यास महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळतील?

आज घडीला लोकसभेच्या निवडणुकी झाल्यास महाराष्ट्रात महायुतीला फक्त 20 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला तब्बल 28 जागा मिळण्याची शक्यता आहे.

4. लोकसभा निवडणुका आज झाल्यास NDA मध्ये कोणाला किती जागा मिळतील?

लोकसभा निवडणुका आज झाल्यास महाराष्ट्रात NDA मधील शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळून फक्त 5 जागा मिळतील तर भाजपला 15 जागा मिळतील. म्हणजेच महायुतीला एकूण 20 जागा मिळतील.

5. लोकसभा निवडणुका आज झाल्यास MVA मध्ये कोणाला किती जागा मिळतील?

लोकसभा निवडणुका आज झाल्यास MVA मध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मिळून 18 जागा मिळतील. तर काँग्रेसला 10 जागा मिळू शकतात. म्हणजेच महाविकास आघाडीला एकूण 28 जागा मिळतील.

यामुळेच हा सर्व्हे महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वासह शिंदे आणि अजित पवार गटासाठी देखील धोक्याची घंटा ठरू शकतो. जर ही नाराजी कमी करण्यात महायुतीला यश आलं नाही तर लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp