Mazi Ladki Bahin Yojana: एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?, फडणवीसांनी केली मोठी घोषणा

रोहित गोळे

03 Jul 2024 (अपडेटेड: 03 Jul 2024, 10:41 PM)

Mazi Ladki Bahin Yojana benefit: एका कुटुंबातील किती महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार याबाबत मागील काही दिवसांपासून संभ्रम होता. याचबाबत देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत नेमकं स्पष्टीकरण दिलं आहे.

एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?

एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?

follow google news

Devendra Fadnavis: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनचे घोषणा होताच याबाबत एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत. महिलांना सरकारकडून थेट पैसे मिळणार असल्याने या योजनेबाबत संपूर्ण राज्यभरात उत्सुकता आहे. मात्र, यासोबतच अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसात दोनदा सरकारने या योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले. अशाच एका बदलाची घोषणा आज स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना केली. (mukhyamantri majhi ladki bahin yojana how many women in a family will get rs 1500 devendra fadnavis made a big announcement)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झाल्यानंतर ती नेमकी कोणाकोणासाठी लागू आहे. त्याचे नियम, अटी काय यावर बरीच चर्चा झाली. पण यासोबतच कुटुंबातील किती महिलांना ही योजना लागू होणार? हा प्रश्न मागील तीन दिवसांपासून सातत्याने विचारला जात होता. ज्याबाबत आज (3 जुलै) देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषेदत नेमकी माहिती दिली.

हे ही वाचा>> Mazi Bahin Ladki Yojana : उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'एक मोठी मागणी येत होती की, या योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून एका कुटुंबातील दोन महिलांना 1500 रुपये प्रतिमहा देण्याचा निर्णय झाला आहे. कुटुंबात एक विवाहित महिला असेल तर एका अविवाहित महिलेला देखील पैसे देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही विषमता किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का? असा जो सवाल येतो त्या प्रश्नाचं देखील उत्तर हे या माध्यमातून आपण दिलेलं आहे.' 

अशी माहिती देत देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत असलेला काहीसा संभ्रम हा दूर केला. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता निकष / CM Majhi Ladki Bahin Yojana Eligibility

1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. ०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

2. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana : 'त्या' प्रकारावर शिंदे संतापले, अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा

3. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

4. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

5. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे  १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र  ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

6. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

7. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

    follow whatsapp