Narhari zirwal News Marathi : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या मागणीने नवा आरक्षण वाद निर्माण झाला आहे. पडळकरांच्या विरोधात आदिवासी समुदाय आक्रमक झाला असून, आता आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. झिरवळांनी थेट सरकार पडणार, असा उल्लेख केल्याने त्यांच्या विधानाची आता चर्चा सुरु झालीये.
ADVERTISEMENT
गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी नाशिकमध्ये आदिवासींनी आंदोलन केले. या आंदोलनात आदिवासी समुदायातील आमदारही उपस्थित होते. त्याचवेळी झिरवळ यांनी हे विधान केलं आहे.
नरहरी झिरवळ काय म्हणाले?
आमदारांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ नेमकं काय म्हणाले, ते बघा…
हेही वाचा >> भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ
झिरवळ म्हणाले, “25 आमदार राजीनामे देतील. पक्षाकडे आमदाराकीचा राजीनामा दिला… एकाच पत्रावर आम्ही सगळ्या पक्षांना देऊ. आम्ही 25 जणांनी मनावर घेतलं, तर सरकारच राहत नाही. कोणतंही असलं तरी राहत नाही. आम्ही सरकारमध्ये आहोत. पण, सरकार हे नंतर आहे. आमदार हे नंतर आहे. पहिला आहे तो समाज. आम्ही आदिवासी आहोत.”
हेही वाचा >> OBC Politics : ओबीसी व्होट बँक राजकारणात किती मोठी गेमचेंजर?
“मी आदिवासी नसतो, तर मी आमदार झालो असतो, असं तुम्हाला वाटतं का? झालोच नसतो. 25 आमदार गेले तर सरकार राहत नाही. कोणता पक्ष हे मान्य करेल की, 25 गेले तर गेले. आम्ही 25 जाऊ पण, ६६ मतदारसंघात आमचे 50 हजारांच्या वर मतदार आहेत. ते आदिवासी आहेत”, असं राजकीय गणितही झिरवळांनी सांगितलं.
गोपीचंद पडळकरांना केलं लक्ष्य
“धनगर समाजाचा एक आमदार विधान परिषदेत आला आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलू लागला म्हणून त्याला किती महत्त्व द्यायचं. आम्ही सर्व पंचवीस आमदार या विषयावर संघटित आहोत. कोणत्याही स्थितीत धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण मिळू देणार नाही. आम्ही या विषयावर रडत बसणार नाही, लढा देऊ”, अशी आक्रमक भूमिका झिरवळ यांनी मांडली.
ADVERTISEMENT