डॉ. एकनाथ शिंदे : 3 वर्षांपूर्वी पदवीधर अन् आता थेट डी. लीट, नेमकी कशी मिळाली पदवी?

मुंबई तक

• 03:30 PM • 28 Mar 2023

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाची डी. लीट पदवी देऊन गौरविले आहे.

Navi Mumbai D. Y. Patil University honored Chief Minister Eknath Shinde with D. Honored with the degree of D.Lit

Navi Mumbai D. Y. Patil University honored Chief Minister Eknath Shinde with D. Honored with the degree of D.Lit

follow google news

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे आता डॉक्टरची पदवी लागणार आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाने मुख्यमंत्री शिंदे यांना मानाची डी. लीट पदवी देऊन गौरविले आहे. आज (मंगळवारी) नवी मुंबई येथे डी.वाय. पाटील विद्यापीठ दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैसही उपस्थित होते. (Navi Mumbai D. Y. Patil University honored Chief Minister Eknath Shinde with D. Honored with the degree of D.Lit)

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डी. वाय. पाटील विद्यापीठाने अनेक थोर विचारवंत, खेळाडू यांना डी. लीट पदवी दिली आहे. आज या यादीत माझे नाव आले. माझ्या मुलाचे वैद्यकीय शिक्षण याच कॉलेजमधून झाले असून मला ही याच विद्यापीठाने डी. लीट. पदवी दिल्याने मला विशेष समाधान झाले आहे. सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्र, राजकारण, आपत्कालीन क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल डी. लीट. देण्यात आली, असं शिंदे यांनी सांगितलं. तसंच मी आधीच छोटी मोठी ऑपरेशन केली असल्याने मी आधीच डॉक्टर झालो होतो, अशीही खोचक टिपण्णी त्यांनी केली.

हेही वाचा : Daya Nayak पुन्हा मुंबई पोलीस दलात… हॉटेल कामगार ते एन्काउंटर स्पेशालिस्ट, असा झाला प्रवास

माझ्यासाठी विनम्रता फार महत्वाची आहे. कौटुंबिक जबाबदारीतून शिक्षण पूर्ण केलं नाही. पण शिक्षण घ्यायचे ध्येय होते. यामुळे गेल्या तीन वर्षांपूर्वी ‘बीए’ची डिग्री पुर्ण केली. ही डिग्री महाराष्ट्र मधील लोकांना अर्पण करीत आहे. जे संघर्ष करून पुढे जात आहेत त्यांना अर्पण करतो.
1989 साली मेडिकल कॉलेज सुरू करायचे होते. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी राजावाडी रूग्णालयाचे दरवाजे उघडून या विद्यापीठाला मदत केली. हे डी. वाय. पाटील विसरले नाहीत. पुढे राज्यपाल होताच ते पहिल्यांदा बाळासाहेबांचा आर्शीवाद घेण्यासाठी मातोश्रीवर आले.

हेही वाचा : sanjay shirsat यांनी लावली आमदारकी पणाला; सुषमा अंधारेंना दिलं आव्हान

माझे नाव माणुसकीच्या यादीत नक्की येईल :

मी सत्तेचे ऑपरेशन केल्यानंतर मागील 8 महिन्यात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले. शेतकरी, मजूर, शिक्षण आदी लोकांची कामे केली. आरोपांना मी उत्तर न देता त्याला कामातून मी उत्तर देतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. जीवनात अनेक संकट आली. अनेक परीक्षा दिल्या. हा एकनाथ शिंदे कधी संकटाला घाबरला नाही.

पद, जबाबदारीचा वापर सर्वसामान्यांचे संकट दूर करण्यासाठी करायचा असतो. त्यांच्या संकटकाळात बाहेर पडून काम करणे हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. 20 टक्के राजकारण, 80 टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण पुढे घेवून जात आहे. एक वेळ माझे नाव श्रीमंतांच्या यादीत येणार नाही. पण माणुसकीच्या यादीत नक्की येईल. महाराष्ट्रामधील जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळेच मी आज इथे आहे, अशी कृतज्ञताही शिंदे यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp