NCP Kolhapur : ‘उत्तरदायित्व पोहचवण्यासाठीच ही कोल्हापूरची सभा’, अजित पवार गटाने भूमिका मांडली

मुंबई तक

• 12:02 PM • 10 Sep 2023

NCP Kolhapur : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोल्हापूरातील सभेनंतर अजित पवारांची आज सभा होते. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता ही सभा उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्वासाठी सभा घेत असल्याचे सुनील तटकरे सांगितले.

Ajit Pawar Sharad Pawar kolhapur meeting

Ajit Pawar Sharad Pawar kolhapur meeting

follow google news

NCP Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरात सभा घेत आहेत. त्यामुळे साऱ्या राज्याचे लक्ष आजच्या तपोवन मैदानात होणाऱ्या सभेकडे लागून राहिले आहे. आजच्या होणाऱ्या या सभेबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (NCP MP Sharad pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका सांगितली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या कोणत्याही आमदारांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची फारकत घेतली नसल्याचे सांगत ही सभा शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी नसून लोकांपर्यंत उत्तरदायित्व पोहचवण्यासाठी अजित पवार यांची सभा घेत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

पुरोगामी विचारांबरोबर फारकत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि शरद पवारांना सोडून अजित पवार गटातील काही आमदारांनी भाजपसबोत जात सत्तेत सहभागी झाले. त्यावरून शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी अजित पवार आणि त्यांच्या साथीदारांवर जोरदार टीका केली. ही टीका होऊ लागल्यामुळेच सुनील तटकरे यांनी कोल्हापूरात आम्ही पुरोगामी विचाराबरोबर कोणतीही फारकत घेतली नाही असंही त्यांनी स्पष्टपण सांगितले.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ‘…आता तुम्ही मशालीची धग अनुभवा’, ठाकरेंनी भाजपला सुनावलं

जिल्ह्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका मांडणार

खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाची भूमिका मांडताना सांगितले की, आम्ही सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचारांशी आम्ही फारकत घेतली नाही. विकासाच्यादृष्टीनेच हा विचार केला असल्याचे सांगितले. त्यामुळे अजित पवार यांच्या सभेत जिल्ह्याच्या विकासासाठी अजित पवार गटाची काय भूमिका असणार हेच आजच्या सभेतून मांडणार आहे असंही त्यांनी आज बोलून दाखवले.

उत्तरदायित्व पोहचवण्यासाठीच सभा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापूरातील सभा होत असली तरी ती शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी सभा नाही. तर आमचं उत्तरदायित्व नेमकं काय असणार आणि ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही आम्ही सभा घेत आहोत असंही तटकरे यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> Pankja Munde:’शिवशक्ती परिक्रमा यात्रा हाणून पाडण्याचा डाव’, पंकजा मुंडेंचा स्फोटक दावा

कोल्हापूरचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांच्याबरोबरचा एक गट भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार का असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. त्यावरही आज तटकरेंनी हे गणेशोत्सवाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन कोल्हापूरचे पालकमंत्रिमपद हे राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदावर भाजपसोबत कोणतेही वाद होणार नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp