Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देशमुखांच्या हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करून न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसच या हत्या प्रकरणात जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी एनसीपीचे पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी खळबळजनक विधान केलं. या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाईंड असल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
आमदार संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
"कुटुंबाची जी काही जबाबदारी असेल, ती आम्ही आमदार, खासदार म्हणून स्वीकारू. वाल्मिक कराडच मास्टरमाईंड आहेत. हा जिल्हा एकदम पुरोगामी विचारांचा आहे. या माणसाने (वाल्मिक कराड) सगळी काशी करून टाकली आहे. या माणसाने दोन समाजात तेढ निर्माण केलं आहे. रडून चालणार नाही. आपल्याला घाबरायची गरज नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाहीत. उद्या आम्ही सर्वच पक्षाची बैठक बोलवत आहोत. खंडणीच्या विषयात वाल्मिक कराडचं नाव टाकलं आहे. ते 6 तारखेला टाकलं पाहिजे होतं, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडला सरकार अटक का करत नाही? खासदार निलेश लंकेंनी थेट सांगितलं, म्हणाले...
दरम्यान, मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करताना शरद पवार म्हणाले, "बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुखच्या हत्येचा मुद्दा लावून धरला. संसदेत ते बोलत राहिले. राज्याच्या विधानसभेत संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा मांडला. जातीचा विचार न करता त्यांनी हा मुद्दा मांडला. अन्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी हा मुद्दा मांडला. या जिल्ह्यात जे घडलं ते कोणालाही न पटणारं आहे. संतोषचा यात काहीच संबंध नसताना हे घडलं. या प्रकरणाची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. आमच्या सहकाऱ्यांनी यात न्याय मिळावा म्हणून लोकसभेत आवाज उठवला. बीडमध्ये आज दहशतीचं वातावरण आहे, पण त्यातून बाहेर पडा. हत्या करणारे आरोपी आणि सूत्रधार यांना शिक्षा झालीच पाहिजे"
हे ही वाचा >> Partner Swapping Case : गर्लफ्रेंडची अदलाबदली करण्याचा हा काय प्रकार? गुन्हे शाखेकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
ADVERTISEMENT