Sharad Pawar Ajit Pawar : शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्तभेटीने वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. या भेटीबद्दल बोलताना वडेट्टीवार यांनी अजित पवारांना भाजपने मोठी अट घातलेली असून, त्यामुळेच ते शरद पवारांना भेट असल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार हे शरद पवारांना भाजपची ऑफर घेऊन भेटले होते, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान कार्यालयात ते मंत्री सुद्धा होते. त्यांचा अनुभव आणि माहिती मोठी आहे, त्या आधारावर ते म्हणाले असतील. पण, गुप्त बैठकीमध्ये आपण कुणीच नसतो त्यावेळी त्यांचं काय बोलणं झालं याची माहिती त्यांचा सोर्स हा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असेल त्यामुळे त्यांनी वक्तव्य केल असेल”, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
वाचा >> Sharad Pawar: अजितदादांनी पवारांची साथ सोडली, पण ‘या’ दोन तरुणांनी थोपटले दंड
‘भाजपने अजित पवारांना अट घातलीये’
वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, “अजित पवार वारंवार शरद पवार यांना का भेटतात, तर दोन पक्ष फुटल्यानंतर सुद्धा भाजपची परिस्थिती सुधारत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्यांना शरद पवारांची गरज आहे. ते की मास लीडर आहेत; त्यांच्या मागे जनाधार आहे, अशा नेत्याची मदत मिळाल्याशिवाय त्यांचा लोकसभेत आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मागे लागले आहेत.”
वाचा >> Sharad Pawar Nawab malik : पवारांचा मलिकांना फोन, काय झालं बोलणं?
“दुसरं कारण असं आहे की, नरेंद्र मोदीजींनी अट घातली आहे की, शरद पवार सोबत आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही, अशी ही माहिती समोर येत आहे”, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
‘अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे आहे म्हणून…’
“त्यांना (अजित पवार) मुख्यमंत्री व्हायचे म्हणून शरद पवारांना सोबत चला असे म्हणण्याचा आग्रह असावा. आम्ही एकत्र आहोत. शरद पवार आमच्या सोबत आहेत. आपण आज शरद पवार यांच्या भाषणाची प्रतीक्षा करूया ते काय म्हणतात, कुठल्या दिशेने त्यांचा विचार लोकांना दिसेल, पण असं आहे की आम्ही तिघेही एकत्र आहोत परंतु संभ्रम आहे तो लवकर दूर होईल आणि महाविकास आघाडी मजबूतीने येणाऱ्या निवडणुकीला समोर जाईल”, असे वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT