अखेर आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल, कानशिलात लगावलेलं प्रकरण भोवणार

मुंबई तक

06 Jan 2024 (अपडेटेड: 06 Jan 2024, 05:53 AM)

पुण्यातील ससून रुग्णालयातील कार्यक्रमावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसावर हात उगारल्या प्रकरणी बंडगार्डन पोलिसात गुन्हा नोंद झाल्याने हे प्रकरण आता त्यांना भोवणार असल्याचे बोलले जात आहे.

Mumbaitak
follow google news

MLA Dilip Kamble : पुण्यातील ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमामध्ये मानापमानाचे नाट्य घडले. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी स्टेजवरून खाली उतरत असतान त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला होता. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. मात्र आता त्यांच्याविरोधात पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलल्याप्रकरणी त्यांच्यावर बंडगार्डन पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

कांबळेंच्या अडचणीत वाढ

ससून रुग्णालयाच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केली होती. पोलीस कर्मचारी सेवा बजावत असताना त्यांच्यावर हात उगारल्याने आता सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा!’, ‘सामना’तून कर्मचाऱ्यांसाठी साकडे

नेमका वाद काय?

सुनील कांबळे हे भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयातील कार्यक्रमाच्या पत्रिकेवरून त्यांचा आणि जिल्हाधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबरही वाद झाला. त्यांचे नाव नसल्याने त्यांनी कार्यक्रमाची पत्रिका जाहीर झाल्यापासूनच नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे नाव नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाद घालत जाणीवपूर्वक माझे नाव टाळले असल्याचा त्यांच्यावर त्यांनी आरोप केला होता. तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी आधी वाद घातला होता. त्यानंतर स्टेजवरून उतरत असताना त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. त्यावरून हे प्रकरण तापले होते.

त्या प्रकरणावर सारवासारव

पोलीस कर्मचाऱ्यावर हात उगारल्यानंतर आणि तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला मात्र आता थेट त्यांच्यावर बंडगार्डन पोलिसात गुन्हा नोंद झाला असून हे प्रकरण त्यांना भोवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    follow whatsapp