Jiretop : मोदींना जिरेटोप घातल्याने उफळला वाद; आता प्रफुल पटेल म्हणाले...

मुंबई तक

15 May 2024 (अपडेटेड: 15 May 2024, 11:45 AM)

Jiratop Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घातला. त्यावरून महाराष्ट्रात वाद उफाळून आला. या वादानंतर आता पटेलांनी एक पोस्ट शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रफुल पटेल नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालताना.

पंतप्रधान मोदींना जिरेटोप घालताना प्रफुल पटेल.

follow google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावरून वाद

point

प्रफुल पटेलांनी मोदींना घातला जिरेटोप

point

पटेलांनी जिरेटोप वादावर केला खुलासा

Jiretop Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याने राजकीय वादाला तोंड फुटले. याचे महाराष्ट्रातील राजकारणात पडसाद उमटले विरोधकांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हणत सत्ताधारी महायुतीला धारेवर धरले. वाद वाढत असतानाच आता प्रफुल पटेल यांनी खुलासा करत भूमिका मांडली आहे. (Controversy has arisen due to wearing a jiratop on Modi. Now NCP Leader Praful Patel clear his stand about it.)

हे वाचलं का?

नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून १४ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी मोदींना शुभेच्छा देत त्यांच्या डोक्यात जिरेटोप घातला.

हेही वाचा >> ठाकरेंचा PM मोदींसह पटेलांवर हल्ला; 'ज्या डोक्यावर जिरेटोप घालताय, ते डोकं....' 

केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर दिसणारा जिरेटोप मोदींना घातल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रफुल पटेल आणि भाजपलाही सुनावले. यावरून वाद चिघळला असतानाच आता पटेल यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. 

प्रफुल पटेल काय म्हणाले?

"हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ", असे म्हणत प्रफुल पटेल यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाबद्दल काय आहेत संकेत?

जिरेटोपाच्या संकेतबद्दल ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी सांगितलं की, "छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय कोणीही जिरेटोप परिधान करू शकत नाही. इतर सर्व मावळे किंवा सरदार हे पगड्या, फेटे घालत होते. हा अधिकार केवळ छत्रपतींचा होता. इतर कोणीही हा अधिकार घेण्यास पुढे धजावलेला नाही. असा ऐतिहासिक संदर्भ आहे."

हेही वाचा >> सोन्याच्या 4 अंगठ्या, बँकेत...; मोदींकडे किती संपत्ती?

"शिंदे, होळकर यांच्या सारख्या बलाढ्य सरदारांनीही कधी जिरेटोप घातलेला नाही. मोदी यांची मर्जी मिळविण्यासाठी उत्साहाच्या भरात कोणी काहीही करीत आहे. उद्या राज्यभिषेक करून मोकळे होतील", असे जयसिंगराव पवार यांनी लोकसत्ता वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

विरोधकांकडून मोदी, पटेलांवर टीका

"प्रफुल भाई, लाचारी किती करावी? तुम्ही त्यांना टोप्या घाला. दुसऱ्या कोणत्याही घाला, पण महाराजांचा जिरेटोप ज्यांच्या डोक्यावर ठेवताय, ते डोकं कसं आहे ते तपासा. प्रफुल भाई हा तुम्ही महाराजांचा अपमान करताय. तुम्ही लाचार झालात. मोदींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची शान घालवताय. मोदींनी असं महाराष्ट्रासाठी केलंय तरी काय?", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

हेही वाचा >>  "एकनाथ शिंदे 7-8 तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते" 

खासदार अमोल कोल्हे यांनीही "आपण काय करत आहोत, हे प्रत्येकाला कळायला हवे", असा टोला प्रफुल पटेलांना लगावला होता. तर "प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घातला त्यात मोदी यांचा काय दोष?", असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

    follow whatsapp