Maratha Reservation : “मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही...”, प्रसाद लाडांचा जरांगेंना मोठा प्रस्ताव

मुंबई तक

21 Jul 2024 (अपडेटेड: 21 Jul 2024, 12:55 PM)

Prasad Lad Manoj Jarange: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर मनोज जरांगे पाटलांनी टीका केली होती. त्यानंतर प्रसाद लाड यांनी जरांगेंसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे.

मनोज जरांगे पाटील यांना प्रसाद लाड यांनी नवा प्रस्ताव दिला आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड मनोज जरांगे यांना काय म्हणाले?

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रसाद लाड यांचे मोठे राजकीय विधान

point

मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देताना काय केली विनंती?

point

प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांना काय म्हणाले?

Prasad Lad on Manoj Jarange: “मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे”,  असे सांगत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना मोठा राजकीय प्रस्ताव दिला आहे. मनोज जरांगेंनी टीका केल्यानंतर आज प्रसाद लाड यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत मनोज जरांगे यांना एक विनंतीही केली आहे. (Prasad Lad appealed to Manoj Jarange that I resign from MLA and get you elected.)

हे वाचलं का?

प्रसाद लाड मनोज जरांगेंना काय म्हणाले?

मनोज जरांगे यांना आवाहन करताना आमदार लाड म्हणाले,मनोज भाऊ, तुमची मुलाखत बघितली. तुम्ही मला भाऊ आणि दादा म्हणालात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी म्हटलंच होतं की, तुम्ही कितीही वाईट शिव्या दिल्या, तरी मी तुम्हाला शिव्या देणार नाही. तुमची तक्रार करणार नाही कारण तुम्ही माझे भाऊ आहात. आज तुम्ही मला भाऊ म्हटलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.”

हेही वाचा >> ''अजित पवार महायुतीतुन बाहेर पडले, तरच...'', आंबेडकरांचं मोठं राजकीय विधान

आपण अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलात. उपोषणाचा मुद्दा अतिशय चांगला आहे, मराठा आरक्षण. आम्हीही तुमच्याबरोबर आहोत. पण, भाऊ मला वाटतं की, कुठेतरी आपला उपोषणाचा मुद्दा भरकटतोय. सरकारने ज्या योजना आणल्या... मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल... आपण त्यावर थोडीशी टीका केली. मला वाटतं की, सरकारी योजना, सरकारी राजकारणात आपण पडू नये. ही आपली पहिल्यापासून इच्छा होती.

मनोज जरांगेना प्रसाद लाड यांनी केली विनंती

तुम्ही टीका केली म्हणून मी आपल्यावर टीका करत नाही. लहान भाऊ म्हणून छोटसं मार्गदर्शन करतो. आपल्याला योग्य वाटलं तर आपण ते स्विकारावं ही माझी आपल्याला विनंती आहे. भाऊ, आपण म्हणालात की, ही योजना चुकीची आहे. मला वाटतं की, जवळजवळ तीन कोटी महिला भगिनी, मातांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

दीड-दीड हजार असे तीन हजार एका घरात जाणार आहेत. आपण मराठवाड्यात आहात. आम्ही शहरात राहतो. आम्हाला गावची जास्त माहिती नसते. परंतु, जे काही आम्हाला मामाचं गाव म्हणून कळलं, त्यामध्ये एका गावच्या महिलेच्या घरी तीन हजार रुपये गेले, तर तिचा अख्खा महिना हा सुंदर सुखी जाऊ शकतो.

सरकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार तुम्ही केला पाहिजे -प्रसाद लाड

मनोज भाऊ, दहावी झालेली पोरं मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणावर आहेत. त्यांना जर ६००० रुपये महिन्याला मिळाले, तर त्यांच्या शिक्षणाची पुढची सोय आणि रोजंदारी करण्यासाठी व्यवसाय हा त्यांना निश्चित मिळू शकतो.

हेही वाचा >> भाजपचा आकडा ठरला? पवार-शिंदे करावा लागणार मोठा त्याग!

आपण खरंतर सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. महायुती सरकारचा समन्वयक म्हणून मी आपल्याला विनंती करतो की, या योजनेचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. समाजामध्ये गरीबी आहे. चार कोटी मराठा समाजापैकी तीन कोटीहून अधिक समाज गरीब आहे. त्यांच्या घरात जर ८ आणि दहा हजार जाऊ लागले, तर मला निश्चितपणे समाजाला ताकद आणि बळ देण्याचं काम होईल, असे प्रसाद लाड मनोज जरांगेंना म्हणाले.

आम्ही राजकारणच करतो, तो आमचा पिंड आहे

आपल्याला भटकायचं नाही. आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यासाठी तुम्ही लढलंच पाहिजे. मला वाटतं तुम्ही राजकारणापासून थोडं अलिप्त राहिलं पाहिजे. आपण म्हणता की, प्रसाद लाड, प्रविण दरेकर राजकारण करतात. मी म्हणतो की आम्ही राजकारण करत नाही, आम्ही राजकारणच करतो. आमचा तो पिंड आहे. पण, समाजकारण हे आमचं ध्येय आहे”, असे प्रसाद लाड हे मनोज जरांगेंना म्हणाले.

हेही वाचा >> सुप्रिया सुळे अजित पवारांवर कडाडल्या, पुण्यातल्या बैठकीवर काय म्हणाल्या?

तुम्ही समाजकारणपासून राजकारणापर्यंत जाऊ नका. जर तुम्हाला खरंच राजकारणात यायचं असेल, तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे. सभागृहात या. सभागृहात चर्चा करा. नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून तुम्हाला आवाहन करतो.

प्रविण दरेकर आणि मी आमदारकीचा राजीनामा देतो, लाडांचा जरांगेंना प्रस्ताव

भाऊ, माझी विनंती तुम्ही मान्य करा. एकदा तरी तुम्ही मला चर्चेला बोलवा. नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या. मी आणि प्रविण दरेकर राजीनामा देतो. आपण, आपले सहकारी सभागृहात या. ठामपणे आपला मुद्दा सभागृहात मांडा. आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत, असा प्रस्तावही प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना दिला.

    follow whatsapp