मुंबईत विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक सुरु होणार आहे. या बैठकीआधीच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 1 बिलि़यन डॉलर गौतम अदानींमार्फत देशाबाहेर गेले आहेत. त्यामुळे हा पैसा कुणाचा आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. याचसोबत पंतप्रधान मोदींनी यावर माध्यमांना उत्तरे द्यावीत, असे देखील आवाहन केले आहे. (rahul gandhi big allegation guatam adani and pm modi money is being sent out of country mumbai india meeting)
ADVERTISEMENT
राहुल गांधी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. जी20 ची मिटींग सुरु आहे. अनेक देशातून नेते येतातय. या दरम्यान आजच अनेक बिझनेस न्युजपेपर्सनी ”एक कुटुंब जे मोदींच्या जवळ आहे, त्यांनी आपल्या शेअर्समध्ये पैसै गुतवले आहेत, अशी हेडींग दिल्याचे राहुल गांधी सांगत, 1 बिलि़यन डॉलर अदांनींच्या कंपनीतर्फे भारताबाहेर इतर देशात गेले आहेत आणि ते परतही आले आहेत. याचा परिणाम शेअर्सच्या किमतींवर झाला आहे. या पैशातून देशातील पायाभूत सुविधा विमानतळ आणि बंदर विकत घेतली जाणार आहेत. वृत्तपत्रांकडे याबाबतचा पुरावा देखील असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : One Nation-One Election: PM मोदींचं धक्कातंत्र, टाकला नवा डाव अन्…
हा जो पैसा वापरला जातोय, तो कुणाचा आहे? हा पैसा अदानींचा आहे की आणखीण कुणाचा आहे? हे काम करणारा मास्टरमाईंड विनोद अदानी आहे, जो गौतम अदानीचा भाऊ आहे, आणि त्याचे दोन पार्टनर्स नासीर अली सबान अली आणि एक चायनीज चेंग चोंग लिंग आहे, असा खुलासा राहुल गांधी यांनी केला आहे.
अदानी भारतातील पायाभूत सुविधा खरेदी करत आहेत. त्यात चायनीज नागरीकाचा का सहभाग आहे? त्याची यामध्ये काय भूमिका आहे? तसेच अदानी सरंक्षण, विमानतळ, बंदरात काम करतायत, तर चिनी लोकांची यात भूमिका काय आहे? असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणात कठोर कारवाई का करत नाहीत.ते शांत का आहेत. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे नाते असल्याचे वृत्तपत्र सांगत आहेत. आता प्रश्न आहे यांचं नातं काय आहे? सीबीआय, ईडी, अदानी या प्रकरणाची चौकशी का करत नाही. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात अॅक्शन घेऊन जेपीसीच्या चौकशीची मागणी केली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT