Rahul Narvekar on Mla Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी 20 डिसेंबर रोजी पूर्ण झाली. या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार? याबद्दल माहिती दिली.
ADVERTISEMENT
राहुल नार्वेकर म्हणाले, “आमदार अपात्रता याचिकांवरील अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे. हे प्रकरण आता क्लोज फॉर ऑर्डर झाली आहे. त्यामुळे या संदर्भातील पुरावे सादर केले गेले आहेत. जो युक्तिवाद केला गेला आहे आणि इतर जे कागदपत्र आहेत, त्या सगळ्यांचा तपास करून योग्य निर्णय आम्ही सुप्रीम कोर्टाने जी अपेक्षा व्यक्त केली आहे, त्या कालमर्यादेत आम्ही देऊ”, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
निकालाची प्रक्रिया कशी असेल? नार्वेकरांनी दिली माहिती
सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे, याची पुढची प्रक्रिया कशी असेल, असा प्रश्न नार्वेकर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “पक्षांतर बंदीच्या कायद्याचा १०व्या परिशिष्टात उल्लेख आहे. हा कायदा सुधारणा झालेला आहे. त्यात अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत. ज्यावेळी दुरुस्ती झाली, त्या वेळी तो कायदा अधिक बळकट आणि सक्षम झाला”, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा >> फडणवीस-पवारांचा पहाटेचा शपथविधी शिंदेना भोवणार? ठाकरेंच्या वकिलांनी गाठलं खिंडीत
“सर्वोच्च न्यायालय असो वा उच्च न्यायालयातही या कायद्यातील अनेक तरतुदींचा अर्थ वेगवेगळ्या वेळी लावला गेला आहे. या यासंदर्भातील याचिकांवर अनेक निर्णय घेतले गेले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा संसदेत, त्यातून काय तयार झाला”, अशी माहिती नार्वेकरांनी दिली.
अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती -नार्वेकर
“महाराष्ट्रातील परिस्थिती आहे, ती अत्यंत वेगळी आहे. कधी अशी परिस्थिती इतर राज्यात निर्माण झाली नव्हती. अशी परिस्थिती या अपात्रता याचिकांमध्ये दाखवण्यात आली आहे. या अपात्रता याचिकांसंदर्भात सर्व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून सर्व घटकांचा विचार करून एक योग्य निर्णय आपण देऊ, जेणेकरून हा निर्णय एक चांगला आदर्श देशामध्ये बनेल”, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा >> CM एकनाथ शिंदे म्हणाले ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, पण…
खरी शिवसेना कुणाची?
आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिले आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने खरा पक्ष कुणाचा, हे ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेंकडेच राहणार की, ठाकरेंकडेच्या ताब्यात जाणार, निकालाने स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT