Uddhav Thackeray And Raj Thackeray : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. परंतु, राजकीय वर्तुळात सगळ्यात जास्त चर्चा रंगलीय ती मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत दिल्यानंतर राज ठाकरेंनीही सकारात्कम प्रतिसाद दिल्याचं समोर आलं आहे. "आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत", असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीबाबतच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिलंय. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंची टाळी, म्हणाले...
"मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अगदी किरकोळ भांडण, किरकोळ भांडण काय हे तुम्ही बाहेर गेल्यावर बातम्या वाचल्यावर कळेल किरकोळ भाडण काय आहे ते, किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे. सर्व मराठी माणसांना महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसेभाला सांगत होतो की महाराष्ट्रातन गुजरातमध्ये कारभार, उद्योग घेऊन जातायत, तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडं बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं", असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हे ही वाचा >> जावई नाही आता तोच नवरा... सासूचा लग्नासाठी हट्ट, मुलगा आला समजवायला अनिता म्हणाली, 'येत नाही जा!'
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार राज्यात बसलं असतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा परत तडजोड करायची, असं नाही. महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरमी जाणार नाही, त्याचं आगतस्वागत मी करणार नाही, त्य़ाच्याबरोबर पंगतीला मी बसणार नाही. हे पहिलं ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा.
"बाकी आमच्यातली भांडणं, जी काही भांडणं माझ्याकडणं नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला. पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राचं हित. मग त्यावेळी सगळ्या मराठी माणासांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं की शिवसेनासोबत म्हंजे माझ्याबरोबर. एसंशि नाही.
बाकी आमच्यातली भांडणं, जी काही भांडणं माझ्याकडणं नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला. पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राचं हित. मग त्यावेळी सगळ्या मराठी माणासांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं की शिवसेनासोबत म्हंजे माझ्याबरोबर. एसंशि नाही. गद्दार सेना नाही.
हे ही वाचा >> कामाची बातमी: मुलांचं आधारकार्ड अपडेट करताना लक्षात ठेवा 'हे' नियम, नाहीतर खूप होईल त्रास!
पण ठरवा, कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं आणि हिंदुत्त्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर की भाजबरोबर. मग काय द्यायचा असेल तो पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा अगदी बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये.महाराष्ट्राचं हित ऐव्हढी एकच शर्त आहे माझी. पण मग बाकिच्यांना या चोरांना, कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
