Raj Thackeray Criticize sharad pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाला
मिळालेल्या तुतारी ('तुतारी वाजवणारा माणूस') या पक्षचिन्हाचे आज किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. या सोहळ्यावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना जोरदार टीका केली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला आहे.',अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवारांना जोरदार टोला हाणला आहे. (raj thackeray criticize sharad pawar on turha symbol raigad fort ncp politics maharashtra Politics)
ADVERTISEMENT
राज ठाकरे डोंबिवलीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरेंना शरद पवार गटाच्या नवीन पक्षचिन्हाच्या रायगडावरील सोहळ्यावर प्रश्न विचारण्यात आलो होता. 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवलाय, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला आहे.
हे ही वाचा : पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट, कारण काय?
दरम्यान याआधी मी घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांना मी प्रश्न केला होता. तुम्ही शाहु, फुले, आंबेडकरांचे नाव घेता, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तुम्ही घेत नाही? शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याने मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आहेत. आणि आता त्यांना शिवाजी महाराज आठवले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच आपल्याकडचे महापूरूष आपणच जातीमध्ये विभागून टाकले आहेत आणि महापूरूषांवरून राजकारण आता सूरू झाले आहे.तसेच शरद पवारांनी तुतारी चिन्ह मिळाले, मग काय करायचे, तुतारी फुंका,असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.
हे ही वाचा : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील नातेवाईकाला गोळ्या घालून संपवलं
राज ठाकरे महायूतीत सामील होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेवर राज ठाकरे म्हणाले, एखाद्या व्यासपीठावर सामील होणे, यावर युत्या, आघाड्या होत नसतात, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. तसेच मराठा आरक्षणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'मी आधी बोलतो, मग तुम्हाला नंतर माझी भुमिका पटते. मी मराठा आरक्षणासंदर्भात देखील हेच म्हटलं होतं. बोललो होतो की नव्हतो. काय झालं त्याचं शेवटी...मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलतो आणि त्याचे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो. त्यावेळेला काही जणांना पटत नाही त्या गोष्टी, पण कालांतराने त्या पटतात, असे राज ठाकरे म्हणतात.
ADVERTISEMENT