MNS BJP Alliance : अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बुधवारी मध्यरात्री राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अज्ञातस्थळी भेट झाली. दोघांमध्ये ३० ते ४५ मिनिटे चर्चा झाली. 'भेटी होतच असतात', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला आहे. (Raj Thackeray meets Devendra Fadnavis at midnight)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये राज ठाकरे यांची मनसेही सामील होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
ठाकरे-फडणवीस भेट
भाजपकडून मुंबईत बेरजेचं राजकारण सुरू असून, मनसेला सोबत घेण्याची तयारी सुरू झाली आहे. याच संदर्भात राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. आता महायुतीतील पक्षाचे नेते आणि राज ठाकरे यांचीही चर्चा होणार आहे. त्यापूर्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गोपनीय भेट झाली.
हेही वाचा >> शिंदेंच्या सेनेच्या 'या' जागांवर भाजपचा कब्जा!
देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी रात्री ११.१५ वाजता ते मुंबई विमानतळावर आले. त्याचवेळी राज ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानातून बाहेर पडले. दोन्ही नेते मुंबई विमानतळ ते लोअर पार्ले या दरम्यानच्या अज्ञात स्थळी भेटले.
रात्री ११.३० ते १२.१५ वाजेच्या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. फडणवीसांच्या भेटीनंतर १२.३० वाजता राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर आले. मध्यरात्री झालेल्या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज ठाकरेंसोबतच्या भेटीला फडणवीसांचा दुजोरा
राज ठाकरे आणि तुमची उशिरा भेट झाली? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उशिरा झाली की, लवकर झाली. तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता. भेटी होतच असतात."
हेही वाचा >> अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना घेरलं, बारामतीत काय घडलं?
फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बोलावली बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.
ADVERTISEMENT