Ajit Pawar and BJP: मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून भाजपला आरसा दाखविण्यात आला आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की, 'लोकसभा निवडणुकीत ४०० चा आकडा पार करण्याचा नारा देणारा भाजप केवळ 240 जागांवरच अडकला, याचे कारण भाजप नेत्यांचा अतिआत्मविश्वास. ‘आएगा तो मोदी ही’ असे मानणारे कार्यकर्ते 'ग्राउंड रिॲलिटी'पासून अनभिज्ञ राहिले.' अशा शब्दात भाजपच्या खालवलेल्या कामगिराचा आढावा घेण्यात आला. (rss mouthpiece organiser article bringing ajit pawar into mahayuti loss to bjp in maharashtra rss criticized bjp in harsh words)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना देखील अजित पवार यांना का सोबत घेतलं? असा सवाल संघ स्वयंसेवक रतन शारदा यांनी या लेखात उपस्थित केला आहे.
हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : ठाकरेंचा अचानक मोठा निर्णय! उमेदवार घेतला मागे
अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध लढा दिला गेला, पण सत्तेसाठी काँग्रेसच्या लोकांना भाजपने सोबत घेतलं, ज्यामुळे कार्यकर्त्यांना बरंच दु:ख झालं. भगवा दहशतवादाचा आरोप करणाऱ्या आणि 26/11 ला आरएसएसचा कट म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे संघाचे स्वयंसेवक दुखावले गेलेत.
'सेल्फी शेअर करून तुम्ही जिंकत नाही'
रतन शारदा यांनी आपल्या लेखात पुढे असं म्हटलं आहे की, 'सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून नव्हे तर जमिनीवर कठोर परिश्रम करून ध्येय गाठले जाते. भाजप कार्यकर्ते हे त्यांच्या आनंदातच मश्गुल होते, मोदीजींच्या जीवावर ते निर्धास्त होते. विजय आपलाच होणार असे त्यांना वाटत होते.' अशा कठोर शब्दात रतन शारदा यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.
हे ही वाचा>> Baramati : सुनेत्रा पवार खासदार होणार? राष्ट्रवादीत घडामोडींना वेग
अजित पवारांनी राज्यमंत्रिपद नाकारलं
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) 25 व्या स्थापना दिनाच्या समारंभात पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा NDA सरकारमध्ये कॅबिनेट खात्याची मागणी केली. ते म्हणाले की, 'आम्ही कॅबिनेट मंत्रिपदापेक्षा कमी महत्त्वाचं पद स्वीकारणार नाही, कारण भाजपने आम्हाला सांगितलं होतं की, त्यांच्या मित्रपक्षांना कॅबिनेट पदं देण्याची गरज आहे.'
पण, मंत्रिपद न मिळाल्यानंतरही अजित पवार यांनी एनडीएसोबतच राहणार असल्याचं यावेळी म्हटलं.. ते म्हणाले- 'आम्ही एनडीएचा भाग राहू. एनडीएकडे सध्या 294 जागा आहेत, पण लोकसभा अधिवेशन सुरू होईपर्यंत हा आकडा 300 पार करेल.'
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राज्यसभेतील खासदाराला प्रफुल पटेल यांना भाजपने राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती ऑफर डिमोशन म्हणत नाकारली. केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी स्वतंत्र प्रभार घेऊन राज्यमंत्रिपद स्वीकारणे योग्य वाटत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आम्ही काही दिवस वाट पाहण्यास तयार आहोत, मात्र आम्हाला केवळ मंत्रिपद हवे आहे.
ADVERTISEMENT