Sana Malik Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 17 महिन्यानंतर तब्बेतच्या कारणामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्याचा जामीन मंजूर केला आहे. त्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली निर्माण झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आणि ते तुरुंगातून बाहेर आले. शरद पवारांच्या जवळचे मानले जात असेले नवाब मलिक जेलच्या बाहेर येताच अजित पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चेला मोठे उधाण आले होते. नवाब मलिक यांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याच्या बातम्या प्रसारित होताच नवाब मलिक यांच्या मुलगी सना मलिक (Sana Malik) यांनी नुकताच एक ट्विट केले आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिकांची भूमिका काय ?
माजी मंत्री नवाब मलिक जेव्हा तुरुंगामध्ये गेले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटतट पडले नव्हते. मात्र नवाब मलिक 17 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आले. त्यावेळी मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी झाली आहे. त्याचमुळे नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची बाजू मांडत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने आणि मलिक जेलमधून बाहेर येताच नवाब मलिकांची भूमिका काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
हे ही वाचा >> Bhagat Singh Koshyari: “अजितदादांची मला दया येते, पण…”; कोश्यारींच्या विधानाने उंचवल्या भुवया
हे ही वाचा >> शरद पवारांसमोर कागलच्या पठ्ठ्यानं कोल्हापूरचा राजकीय इतिहास समोर ठेवला, पवारांनी मग….
पवार कुटुंबीय मलिकांच्या भेटीला
नवाब मलिकांना जामीन मिळताच त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आरोग्याची फोनवरून विचारपूस केली होती. तर सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारणा केली होती. तर त्यातच नवाब मलिक यांची अजित पवारांनी भेट घेतल्यानंतर मलिकांचा अजित पवार गटाला पाठिंबा असल्याच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. त्यामुळे आता नवाब मलिकांची कन्या सना मलिक यांनी आपल्या वडिलांसाठी भूमिका स्पष्ट करत त्यांनी ट्विट केले आहे.
सना मलिक म्हणतात…
सना मलिक यांनी ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, ”माझ्या वडिलांनी विशिष्ट गटाला पाठिंबा दिल्याबद्दल काही बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या सर्व खोट्या अफवा आहेत.आम्ही सध्या फक्त वडिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत.” असं ट्विट करत त्यांनी आपल्या वडिलांच्या आरोग्याला प्रथन प्राधान्य देत असल्याचे म्हटले आहे.
सना यांच्या ट्विटमुळे ट्विस्ट…
सना मलिक यांच्या या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. त्यामुळे यावर नवाब मलिक काय भूमिका स्पष्ट करणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मलिक ईडीच्या कचट्यातून दोन महिन्यासाठी बाहेर आले असले तरी आता मलिक अजित पवार आणि शरद पवार गटाचे जाहिररित्या समर्थन करणार या गोष्टीची आता उत्सुकता लागून राहिली आहे.
ADVERTISEMENT