Sanjay raut criticize pm narandra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात पोछा घेऊन साफसफाई केली. या साफसफाईचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीवर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. लाद्यांवर रेड कार्पेट टाकले असतांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साफसफाईचे दर्शन घडवल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे. इतकंच नाही तर पंतप्रधानांच्या या साफसफाईने सरकारचे 12 लाख रूपये वाया गेल्याचाही आरोप राऊतांनी केला आहे. sanjay raut criticize pm narandra modi clean kalaram temple premises nashik shivsena ubt
ADVERTISEMENT
संजय राऊतांच ट्विट जशाच तसं
आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला.. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते.त्यांनी मंदिर एकदम चका चक केले..या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले. मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते.अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते.तरीही आपल्या पंत प्रधान महोदयांनी हाती mop घेऊन सफाई दर्शन केलेच!याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाई वर खर्च केलेले 10 12 लाख रुपये वाया गेले…
हे ही वाचा : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? राहुल नार्वेकरांनी कायदाच सांगितला
संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून पंतप्रधानांवर हल्ला चढवला आहे. काळाराम मंदिरात रेड कार्पेट टाकले असतानाही पंतप्रधानांनी मॉप घेऊन साफसफाईचे दर्शन घडवल्याचा टोला राऊतांनी मोदींना लगावला. तसेच या कार्यक्रमाला मोदी येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने सफासफाईसाठी 8 ते 10 लाख खर्च केले. तर मंदिर ट्रस्टने देखील सफाईवर 2 ते 4 लाख खर्च केले असताना, पंतप्रधानांच्या साफसफाईची खरच गरज होती का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे सरकारने सफाईवर खर्च केलेले 10 ते 12 लाख रुपये वाया गेल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT