Sanjay Raut : "...म्हणून अमित शाह आक्रोश करताहेत" राऊतांचा पलटवार

मुंबई तक

22 Jul 2024 (अपडेटेड: 22 Jul 2024, 10:10 AM)

Sanjay Raut on Amit Shah : अमित शाह यांनी शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे मुख्य म्होरके, तर उद्धव ठाकरेंना औरंगजेब क्लबचे नेते अशी टीका केली. 

खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांना उत्तर दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि खासदार संजय राऊत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमित शाहांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका

point

खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांना दिले उत्तर

point

शाहांच्या टीकेवर राऊतांनी काय मांडली भूमिका?

Maharashtra Vidhan Sabha : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे मुख्य म्होरक्या आहेत, तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, असे शाह म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी शाहांवर पलटवार केला आहे. (MP Sanjay Raut replied to Amit Shah after he attacked on Sharad pawar and uddhav thackeray)

हे वाचलं का?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "अमित शाहांनी जे वक्तव्य केले, त्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला त्या सगळ्या मराठी श्रोत्यांची कीव येते. इतकी लाचारी, इतका निर्लज्जपणा. गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या पवार-ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य करून निघून जातो."

'ते' सगळे अमित शाहांच्या मांडीला मांडी लावून बसतात -राऊत

"शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले. ते ज्यांच्यामुळे केले, ते प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, ते सगळे आज अमित शाहांच्या मांडीला मांडी लावून बसतात. या सगळ्यांमुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले."

हेही वाचा >> ठाकरे-पवारांवर शाहांचा सर्वात मोठा हल्ला! भाजपची विधानसभेची ‘लाईन’ ठरली? 

"त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शाहांनी केला. शरद पवारांना मोदी सरकारने पद्म विभूषण पुरस्कार दिला. मोदींनी त्यांचे कौतुक केले. याचा अर्थ मोदी आणि शाहांमध्ये काहीतरी भांडण झालेले दिसतं. मतभेद झालेले दिसतात."

हेही वाचा >> ...अन् धबधब्यात 50 जण अडकले? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

"आम्ही जिना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर फुले उधळणारे नक्कीच आम्ही नाही. पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांचा केक कापण्यात आणि खाण्यात आम्हाला रस नव्हता. या देशातील प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची बाजू मांडणं, यात काही चुकीचे नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही बलिदान दिलेले आहे."

राऊत म्हणाले, 'पराभव त्यांच्या जिव्हारी लागला'

"महाराष्ट्राचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा अमित शाह यांनी शरद पवारांवर आरोप केले. उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे नेते म्हटले. तरीही या राज्यातील जनतेने त्यांचा दारूण पराभव केला." 

"गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही, हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अमित शाहांना दिलेला आहे. त्याचा आक्रोश ते आता करत आहेत. भाजपच्या खोटारडेपणाच्या मशीन लावून आम्ही काम करत नाही."

    follow whatsapp