Sanjay Raut : "सुपाऱ्या फेकणारे 100 टक्के शिवसैनिक असतील, पण...", राऊतांचा खुलासा

मुंबई तक

10 Aug 2024 (अपडेटेड: 10 Aug 2024, 12:02 PM)

Raj Thackeray Shiv Sainik shiv sena (ubt) : राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रात दौऱ्यावर असून, बीडमध्ये असताना त्यांचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. यावर घटनेवर संजय राऊत यांनी खुलासा केला. 

शिवसैनिकांनी सुपाऱ्या फेकल्या, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. त्यावर संजय राऊतांनी पक्षाची भूमिका मांडली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंच्या गाडीवर शिवसैनिकांनी फेकल्या सुपाऱ्या

point

बीडमध्ये असताना अडवला ताफा

point

खासदार संजय राऊतांनी केला खुलासा

Thackeray vs Thackeray : राज ठाकरे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला आणि त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या. बीडमधील या घटनेची चांगलीच चर्चा रंगली. यावर आता खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. (Who threw betel nuts on Raj Thackeray's car?)

हे वाचलं का?

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंचा ताफा अडवून शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी गाडीवर सुपाऱ्या फेकल्या. तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. 

राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे कोण?

संजय राऊत म्हणाले की, "एकतर तुमची माहिती चुकीची आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या, त्यात शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात; पण त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही. आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचे होते. आरक्षणासंदर्भात होतं."

हेही वाचा >> बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर? पवारांची घेतली भेट 

मनसेचे लोकही असू शकतात -राऊत

"सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे. त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सगळ्यात पक्षात, मग त्या मनसेचेही लोक असू शकतात", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

"...त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते दिसले असतील"

याच मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "हे जे आंदोलन आहे, मराठा आरक्षणासंदर्भात. ते पक्ष विरहित आहे. जेव्हा यासंदर्भात मोठंमोठे मोर्चे निघाले. एक मराठा, लाख मराठा, तेव्हा त्यात आमच्या शिवसेनेचे मंत्री असतील, मग अजित पवारांचे, काँग्रेसचे, भाजपचे पदाधिकारी सगळे एकत्र होते. आता सुद्धा या आंदोलनात, कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल. त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील."

हेही वाचा >> मृत्यूशी झुंज अपयशी! ज्येष्ठ मराठी अभिनेता काळाच्या पडद्याआड

"ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं. त्या आंदोलनाशी शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही, हे आताच स्पष्ट करू इच्छितो. मी असे म्हणत नाही की, त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत. शंभर टक्के असतील. पण, ते आंदोलन पक्षाचे नव्हते किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती. त्यात सर्व पक्षाचे प्रमुख लोक त्यात उपस्थित होते", असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

    follow whatsapp