Satara Pusesavali : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल (Viral Post) झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली. या प्रकरणामुळे एका गटाने दुसऱ्या गटाच्या धार्मिक स्थळावर हल्ला केला. या हल्यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणावरुन जाळपोळ होत पुसेसावळीत तणाव निर्माण झाला. या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण प्रचंड तापले. संबंधित प्रकरणातील आरोपींना पोलीस ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका एका गटाने घेतली. पोलिसांच्या अश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी आता 23 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून साताऱ्यात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
संचारबंदीसह शांततेत निघणार मोर्चा
पुसेसावळीतील घटनेमुळे परस्थिती आणखी काही अनर्थ घडू नये यासाठी सातारा पोलिसांनी आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यासाठी पुसेसावळीत आज शांतते मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे असा सवाल करत या हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : संभाजी भिडे धावले शिंदे सरकारच्या मदतीला, मनोज जरांगेंना काय दिला मेसेज?
पोलिसांनी दुर्लक्ष केले
पुसेसावळीत पंधरा दिवसांपूर्वी आक्षेपार्ह पोस्टवरुन वाद झाला होता. त्याच वेळी पुसेसावळीतील काही नागरिकांनी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली होती. त्या पोस्टची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती. पोलिसांना या घटनेची माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडली असल्याचे पुसेसावळीतील नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी 23 जणांना घेतले ताब्यात
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पुसेसावळीत धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे प्रकरण टोकाला गेले. हल्लेखोरांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही युवकाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका एका गटाने घेतली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या हल्ल्या प्रकरणी आता 23 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा >>Maratha Reservation : ‘त्या’ मराठा आंदोलकांना शिंदे सरकारचा दिलासा, बैठकीत कोणता निर्णय झाला?
बंद आणि शांततेत मोर्चा
पुसेसावळीतील घटनेआधीच पोलिसांना माहिती दिली होती. तरीही पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यांच्या या कृतीमुळे धार्मिक स्थळावर हल्ला आणि एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. युवकाच्या मृतदेह ताब्यात घेण्यावरून वाद झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आता 23 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आज सातारा बंद असून शांततेत मोर्चा निघणार असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
ADVERTISEMENT